व्हिडीओमध्ये नेमकं काय?
आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. विधिमंडळाचं कामकाज संपवून एका कार्यक्रमासाठी जायला मुख्यमंत्री निघाले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच इतरही काँग्रेस आमदारांची त्यांच्याशी भेट झाली. हस्तांदोलन करून पटोले-शिंदे यांच्यात चर्चा सुरू झाली.
काय चाललंय राज्यात साहेब…? असा प्रश्न नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर जोपर्यंत सामाजिक कार्यकर्ता होता तोपर्यंत ठीक… मर्यादेच्या बाहेर गेला की आपण करेक्ट कार्यक्रम करतो… असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यावर नानांनीही संधी साधत तुम्हीच त्याला वाढवलं ना… असं म्हटलं.
मुख्यमंत्र्यांनी हे विधान जरांगे पाटील यांनाच उद्देशून केल्याने मराठा समाज बांधवांचा मोठा रोष पाहायला मिळतोय. दुसरीकडे काँग्रेसनेही नेमका हाच व्हिडीओ ट्विट करून मुख्यमंत्र्यांचं विधान म्हणजे धमकी समजायची का? उद्या जर जरांगे पाटलांचा जीव गेला तर मुख्यमंत्री जबाबदार असणार का? असे प्रश्न विचारले आहेत.