• Mon. Nov 25th, 2024
    पुणे रेल्वे स्थानकावरील लिफ्टचा प्रश्न निकाली, पहिल्या टप्प्यात तीन लिफ्ट

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे रेल्वे स्टेशन येथील लिफ्टचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. उभारण्यात येणाऱ्या पाच लिफ्टसाठी रेल्वे प्रशासनाने निविदा काढली आहे. पैकी तीन लिफ्ट तातडीने बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.पुणे रेल्वे स्टेशनमधून दिवसाला साधारणत: १२० पेक्षा जास्त गाड्या धावत असून, सव्वा लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, येथे एकही लिफ्ट नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिलांना सामानासह प्लॅटफॉर्मवर जाण्यात अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रत्येक प्लॅटफॉर्मवर लिफ्ट बसविण्याची मागणी केली जात होती.
    लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं तर सत्तेची जोड हवी, शिवसेना-भाजपशी युतीमागील भूमिका अजित पवारांकडून स्पष्ट

    पुणे रेल्वे विभागाने बोर्डाकडेही प्रस्ताव पाठवला होता. तरीही लिफ्टचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. अखेर रेल्वे बोर्डाने पुणे स्टेशन येथील लिफ्टसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. निधी मंजूर होऊनही लिफ्टची निविदा निघत नव्हती. रेल्वे स्टेशनात लिफ्टसाठी जागा शोधण्याबरोबरच अन्य तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र, अखेर लिफ्टसाठी जागेचा प्रश्न निकालात निघाला आहे. त्यानुसार, पाच लिफ्टसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

    पहिल्या टप्प्यात तीन लिफ्ट

    पहिल्या टप्प्यात तीन लिफ्टचे काम करण्यात येणार आहे. दोन लिफ्ट बसविण्यापूर्वी तेथील प्लॅटफॉर्मचे काम केले जाईल. त्यानंतर लिफ्ट बसविण्यात येईल. येत्या तीन महिन्यांत पहिल्या टप्प्यातील लिफ्ट बसविण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    पुणे रेल्वे स्टेशन येथील लिफ्टचा प्रश्न मार्गी लागला असून, निविदा काढण्यात आली आहे. तीन लिफ्टचे काम तीन महिन्यातं पूर्ण केले जाईल.
    – इंदू दुबे, व्यवस्थापक, पुणे रेल्वे विभाग

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *