रमेश परदेशींचा पुणेकरांना इशारा
शिक्षणाचं आणि संस्कृतीचं माहेरघर असलेलं पुणे शहर हे आता नशेचं माहेरघरं होतंय का? याचा आपल्याला गंभीरपणे विचार करायला लागेल. पुण्यातील टेकड्यांवर लोक आपलं शरीर सांभाळण्यासाठी येतात तिथं ही तरुण मुलं मुली अशा प्रकारे नशा करतात. आपल्या आई-वडिलांना माहिती नसतं की मुलं बाहेर नक्की काय करतात त्यामुळं आपण एक पालक, सजग नागरिक, भाऊ, बहिण म्हणून आपण याकडं गांभीर्यानं बघणार आहोत की नाही. यामुळं तरुण पिढी बरबाद होत आहे त्यामुळे जर आत्ताच काही केलं नाहीतर पुण्याचा उडता पंजाब व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा रमेश परदेशी यांनी पुणेकरांना दिला आहे.
ड्रग्जचे आतंरराष्ट्रीय रॅकेट मोडून काढणारे पुणे पोलीस विद्यार्थ्यांना नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्यांवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे