• Fri. Mar 20th, 2026

    बदलापूर स्थानकात तुडुंब गर्दी, टर्मिनस, नव्या स्थानकामुळे सुटेल प्रश्न; रेल्वे मंत्र्यांकडे प्रस्ताव सादर

    बदलापूर स्थानकात तुडुंब गर्दी, टर्मिनस, नव्या स्थानकामुळे सुटेल प्रश्न; रेल्वे मंत्र्यांकडे प्रस्ताव सादर

    Badlapur Terminus: कल्याण ते कर्जत मार्गावर बदलापूर रेल्वे स्थानकावर सर्वाधिक गर्दी असते. यामुळे प्रवाशांसाठी स्थानकाचा विस्तार करणे गरजेचं आहे. या संदर्भात नुकतीच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह बैठकीत चर्चा झाली.

    बदलापूर: मध्य रेल्वेच्या मार्गावर कल्याण ते बदलापूर या स्थानकांदरम्यान प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. यामुळे गेले अनेक वर्ष बदलापूर स्थानकाचा विस्तार करून लोकल फेऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे. या समस्यांसोबत थेट रेल्वे मंत्र्यांकडे धाव घेतली असून गुरूवारी अश्विनी वैष्णव यांच्याकडे बदलापूर स्थानकाच्या विकासाचा प्रस्ताव सादर केला आहे.

    प्रस्तावाल सकारत्मक प्रतिसाद

    बदलापूर परिसरातील वाढत्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पालघरचे खासदार आणि बदलापूर महापालिकेचे माजी अध्यक्ष रामभाऊ पाटकर उपस्थित होते. या बैठकीत बदलापूरमधील नागरिकांच्या समस्या मांडण्यात आल्या. यामुळे नागरिकांच्या मागण्या पूर्ण होतील आणि रेल्वे प्रवाशांना लवकरच दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. या बैठीक प्रवास सोयीस्कर करण्यासाठी अनेक प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावांना रेल्वे मंत्र्‍यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून या प्रकल्पांचा अभ्यास करून लवकरच निर्णय घेतले जातील असे या बैठकीत सांगण्यात आले.Maharashtra TimesBorivali-Gorai Ferry: बोरिवली ते गोराई नव्या जेट्टीमुळे प्रवास 15 मिनिटांत, पण बांधकामाचा प्रवाशांना फटका; अरुंद मार्गामुळे गर्दीत वाढ

    सध्या 80 कोटींची कामे सुरू

    बदलापूर स्थानकादरम्यान सध्या बरीच विकासकामे हाती घेतली आहेत. सध्या मध्य रेल्वेच्या मार्गावर 36 स्थानकांवर कामे सुरू आहेत. यामध्ये फलाटांचं रुंदीकरण सुरू आहे. यानंतर धीम्या व जलद मार्गावर 15 डब्यांच्या लोकल सुरू करण्यात येणार आहेत. हे काम बदलापूर स्थानकावरही सुरू आहे. याशिवाय दोन नवे 12 मीटर रुंद रेल्वे पूल मुख्य आणि छोटे फलाट जोडणारा 150 मीटर लांब डेक आणि आणखी एका 12 मीटर पुलाचं काम सुरू आहे. या कामांसाठी 80 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

    कसा होणार विकास?

    या बैठकीत काही महत्त्वाच्या मागण्या केल्या गेल्या होत्या. सर्वात महत्त्वपूर्ण प्रस्तावात बदलापूर रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा देण्यात यावा याची मागणी करण्यात आली. या प्रस्तावाला अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकाऱ्यांना याबद्दल सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान एक नवं चामटोली रेल्वे स्थानक सुरू करण्याचा प्रस्ताव देखील मांडण्यात आला. यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकावरील गर्दी विभागली जाण्यास मदत होईल. यासह कासगाव आणि कामोठे दरम्यानही एका नव्या रेल्वे मार्गाची मागणी करण्यात आली. रेल्वे मंत्र्‍यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना स्थानकांवर आणि परिसरात पाहणी करून या प्रकल्पांची व्यवहार्यता तपासून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

    Maharashtra TimesPune Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची प्रतीक्षा संपेनाच, डिसेंबर, मार्चची ‘डेडलाइन’ हुकली; आता जुलै महिना उजाडणार

    दरम्यान, या बैठकीत टिटवाळ्यापुढे नवीन गुरवली रेल्वे स्थानक आणि बदलापूर-पुणे दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू करण्याचीही मागणी केली. रेल्वे मंत्र्‍यांनी बहुतेक मागण्यांची तपासणी करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा