• Sat. Sep 21st, 2024

अंतरवाली सराटीत आज मराठा समाजाची महत्त्वाची बैठक, मनोज जरांगे निर्णायक भूमिका घेणार?

अंतरवाली सराटीत आज मराठा समाजाची महत्त्वाची बैठक, मनोज जरांगे निर्णायक भूमिका घेणार?

अक्षय शिंदे, जालना: सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिल्यानंतरही मनोज जरांगे पाटील सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करत आहेत. स्वतंत्र आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहेत का असा प्रश्न उपस्थित करत आमची मूळ मागणी ओबीसीतून आरक्षणाची आहे त्यामुळे सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून आमची मागणी मान्य करावी यासाठी जरांगे उपोषण करत आहेत. मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सोळावा दिवस आहे आज त्यांनी अंतरवाली सराटीत सकल मराठा समाजाची महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे या बैठकीत काय निर्णय होतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.राज्यभरात रास्ता रोको आंदोलन

दहा फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे, जणांनी आंदोलन तीव्र करण्यासाठी रस्ता रोकोची हाक दिली होती. 24 फेब्रुवारीला मराठा समाजाकडून ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र या रास्ता रोको आंदोलन दरम्यान काही ठिकाणी मराठा आंदोलकांवरती गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भात देखील आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. यामुळे आजची बैठक महत्त्वाची मानली जाते.

लोकसभेसाठी भाजप तयार, महिन्याअखेरीस १०० ते १५० उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा 16 वा दिवस असून मनोज जरांगे यांनी समाजाची निर्णायक बैठक बोलवली आहे आज दुपारी 12 वाजता ते बैठकीला संबोधित करून पुढील दिशा ठरवतील,सरकारकडून आपल्यावरती षडयंत्र रचल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला असून काही समाजविरोधी महत्वकांक्षी राक्षसांना उघड पडणार असल्याचे देखील ते म्हणाले होते, त्यामुळे आज नेमकं मनोज जरांगे काय बोलतील आणि या पुढचा निर्णय काय घेतील हे पाहाव लागेल

पुन्हा मुंबईकडे कूच?

सरकारने स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतर मनोज जरांगे हे त्यांच्या मागणीवर ठाम आहे. दरम्यान मनोज जरंगे यांच्या सगेसोयरेच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीच्या मागणीवर हालचाली होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा मुंबईला जाणार का हे बघणे देखील महत्त्वाचा असणार आहे.

मनोज जरांगेंच्या आदेशावर मराठा समाज पुन्हा रस्त्यावर, धुळे-सोलापूर महामार्ग रोखला

मनोज जरांगे उपोषण सोडणार का?

मनोज जरांगे पाटील यांचे अंतरावलीसाठी मध्ये दहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू आहे या दरम्यानच्या काळात सतत मराठा बांधवांकडून जाण्याची पाटील यांना विनंती करण्यात येत होती. आपण आमरण उपोषण सोडावं आणि आदेश द्यावा, रस्त्यावरची लढाई लढू या अशा प्रकारची विनंती मराठा बांधवांकडून पाटील यांना करण्यात येत होती. त्यामुळे आजच्या बैठकीत मनोज जरांगे उपोषण सोडून रस्त्यावरच्या लढाईचा निर्णय घेतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed