• Mon. Nov 25th, 2024
    अकरावीनंतर ५० वर्षांनी कोल्हापुरी घातली, शिवराज भावूक, मुन्ना महाडिकांच्या साथीने चप्पल खरेदी

    कोल्हापूर : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज सकाळी श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर त्यांना कोल्हापुरी चप्पल खरेदी करण्याचा मोह आवरला नाही. भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते.

    मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी थेट एका कोल्हापुरी चपलेच्या दुकानात जाऊन पादत्राणं खरेदी केली. यावेळी त्यांनी “मी विद्यार्थी दशेत असताना कोल्हापूरला आलो होतो. त्यावेळी देखील मी कोल्हापुरी चप्पल घेतली होती आणि आता इतक्या वर्षांनी आल्यानंतर मला चप्पल घ्यायचा मोह आवरला नाही” असं सांगितलं.
    ठाकरेंपासून मनाने दुरावलो, मैत्री उरलेय का त्यांनाच विचारा; देवेंद्र फडणवीसांच्या भावना
    यावेळी भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिकही थट्टामस्करी करताना दिसले. सोबत असलेल्यांना ‘अजयजी आपका (कोल्हापुरी चप्पल) क्या नंबर है? १२ या १५? आपका तो बडा पाव लगता है’ असं म्हणत महाडिक हसले.

    माता-माऊलींचं प्रेम, शिवराज सिंह चौहानांना अश्रू अनावर

    Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

    ‘कोल्हापूर अद्भुत नगरी आहे. कोल्हापुरी चप्पल ही मोठे देण आहे. मी इथे आलेलो अकरावीत असताना. तेव्हा कोल्हापुरी चप्पल घेतली होती. ही गोष्ट असेल १९७५ ची… खूप वर्ष झाली.. जवळपास ४९-५० वर्ष… त्यानंतर आज कोल्हापुरी चप्पल घेतोय…’ अशा शब्दात शिवराज यांनी चप्पल विक्रेत्यांचे आभार मानले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *