• Sat. Sep 21st, 2024
सायरन वाजला, मनसैनिकांना वाटलं राज ठाकरे आले पण नंतर कळलं……

कल्याण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर आहेत. कल्याणमधील दुर्गाडी येथे त्यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते उभे होते. पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा आवाज आला आणि कार्यकर्त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आगमन होत असल्याचं वाटलं. कार्यकर्त्यांनी त्वरित फटाक्यांची माळ लावली. फटाक्यांच्या धुमधडाक्यात घोषणाही देण्यात आल्या. परंतु गाड्या न थांबताच पुढे निघून गेल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. प्रत्यक्षात कार्यकर्त्यांना राज ठाकरे आल्याचं वाटलं परंतु तो केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा ताफा निघाल्याने कार्यकर्त्यांचा एकच फज्जा उडाला.

त्यानंतर काही वेळ कार्यकर्त्यांना देखील काय करावं समजेनासं झालं. काही वेळानंतर राज मनसे यांचं आगमन झाल्यावर कार्यकर्त्यांनी नवीन फटाक्याची माळ आणून ती लावत ठाकरे यांचे स्वागत केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसांच्या कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी कल्याण येथे ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे. राज ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी कल्याणचे द्वार असलेल्या दुर्गाडी चौकात मनसे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले होते.
मुख्यमंत्र्यांच्या लेकाच्या मतदारसंघात सर्वपक्षीय ‘चहल पहल’, उद्धव ठाकरेंनंतर राज यांचाही दौरा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसांच्या कल्याण आणि डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. कल्याण पश्चिममध्ये ते भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार असून पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. शनिवारी सकाळी डोंबिवलीत कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.

अविनाथ जाधव काय म्हणाले?

मला वाटतं उमेदवार कल्याण लोकसभेमध्ये असेल, भिवंडी लोकसभेमध्ये असेल, उर्वरित महाराष्ट्रात असेल. आमच्या आमदाराची लोकप्रियता खूप आहे आणि आमच्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला वाटतं की राजू पाटील हे खासदार व्हावेत. कार्यकर्त्यांची ती भावना आहे. परंतु पुढील निर्णय राजसाहेब आणि राजू पाटील दोघे घेतील.
आशिष शेलार शिवतीर्थावर, मनसे-भाजप महायुतीच्या चर्चांना हवा; राज ठाकरेंना दिल्लीतून बोलावणं?

पुढे बोलताना अविनाश जाधव म्हणाले, कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे आलेले आहेत. भिवंडी मतदार संघाची बैठक ही नंतर होईल. आज आणि उद्या ज्या बैठका होणार आहेत, त्या कल्याण लोकसभा मतदार संघात होणार आहेत.

भाजप व मनसेची जवळीक होत आहे त्याविषयी बोलताना जाधव म्हणाले, त्या दिवशी राज ठाकरे म्हणाले होते की आज मी शिक्षकांच्या विषयात बोलतो. राजकारणाच्या वेळेला राजकारणावर बोलेल. तर उद्या त्यांची पत्रकार परिषद आहे. त्यावेळी ते नक्की यावर बोलतील.

मी माझ्या पहिल्या राजकीय केसची वाट बघतोय आणि जर ती पुण्यातून झाली तर आनंदच | अमित ठाकरे

मागील काही दिवसात कल्याण लोकसभेमध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहेत. आता आमच्या ज्या बैठका चालू आहेत. त्या कल्याण लोकसभेच्या आढावा बैठक सुरू आहेत. राज ठाकरे यांच्याकडून आज कल्याण शहराच्या बैठका होतील व उद्या डोंबिवली शहराच्या बैठका होतील. उद्या सकाळी राज यांची पत्रकार परिषद होईल. संपूर्ण आढावा बैठकीदरम्यान सध्याची परिस्थिती आणि लोकांचे मत राज ठाकरे हे जाणून घेणार आहेत. उद्याच्या पत्रकार परिषदेत ते सगळं उघड बोलतील. आपण एक दिवसांची वाट पाहूया. महाराष्ट्रासह कल्याण डोंबिवलीमध्ये जे काही घडत आहेत त्याविषयी ते आपले स्पष्ट भूमिका मांडतील असे जाधव यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed