• Sat. Sep 21st, 2024
अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगले… मनोहर जोशी यांच्या निधनानंतर संजय राऊत शोकाकुल

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हिंदुजा रुग्णालयात अतिदक्षता विभागात मनोहर जोशींवर उपचार सुरु होते. परंतु शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोशींना ‘एक्स’ सोशल मीडियावरुन आदरांजली वाहिली आहे.

“शून्यातून विश्व निर्माण करणारे.. कडवट महाराष्ट्र अभिमानी, अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगलेले मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन!” अशा शब्दात संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
फक्त बारा जागा कशा? भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, शिंदेंचे खासदार गजानन कीर्तिकर नाराज
“मनोहर जोशी हे झुंजार नेते होते. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांची झुंज सुरु होती. शिवसेनेच्या इतिहासातील प्रत्येक आंदोलनात ते सहभागी होते, सीमाप्रश्नी आंदोलनात बाळासाहेबांना अटक झाली, त्यावेळी त्यांच्यासोबत मनोहर जोशी होते. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून सर्व संसदीय पदांवर काम केलं. ते उत्तम वक्ते होते, त्यांचं वाचन उत्तम होतं आणि ते अभ्यासू नेते होते. जोशी एक यशस्वी उद्योजक, हाडाचे शिक्षक होते, पक्षपात न करता संसद कशी चालवावी, हे त्यांनी दाखवून दिलं. एक शिवसैनिक म्हणून मी नेहमी त्यांचा आदर केला” अशा भावना संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी विशेष विमानाने ते मुंबईला दाखल होणार आहेत. त्यानंतर ते जोशींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतील.

संजय मंडलिकांकडून मुख्यमंत्री शिंदेंना तलवार भेट

कोण होते मनोहर जोशी?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासातील नेते अशी डॉ. मनोहर जोशी यांची ओळख होती. नगरसेवक, महापौर, विधानसभा आमदार आणि विधानपरिषद सदस्य, विधानसभा विरोधीपक्ष नेते, मुख्यमंत्री, लोकसभा खासदार, केंद्रीय मंत्री, राज्यसभा सदस्य आणि लोकसभा अध्यक्ष अशी त्यांची बहुआयामी कारकीर्द राहिली आहे.
मतांपेक्षा जास्त उमेदवार, तीन राज्यात भाजपची खेळी, राज्यसभेच्या १५ जागांसाठी निवडणुका अटळ
१९६७ मध्ये वयाच्या तिसाव्या वर्षी मनोहर जोशींनी शिवसेनेत संघटनात्मक जबाबदारी स्वीकारली. त्यांनी १९७६ मध्ये मुंबईचं महापौरपदही भूषवलं होतं. १९९५ मध्ये शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर बाळासाहेबांनी मनोहर जोशींवर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली होती. महाराष्ट्राचे पहिले गैर-काँग्रेसी मुख्यमंत्री होण्याचा मान जोशींना मिळाला होता. जोशींनी चार वर्ष मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

पुढे अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारमध्ये मनोहर जोशींनी लोकसभा अध्यक्षपद भूषवलं. गेल्या काही काळापासून मात्र ते राजकारणापासून अलिप्त राहिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed