• Sat. Sep 21st, 2024

निर्यात क्षेत्रात कोकण विभाग प्रथम, राज्य निर्यात पुरस्करांचे वितरण, २४ संस्थासोबत सांमजस्य करार

निर्यात क्षेत्रात कोकण विभाग प्रथम, राज्य निर्यात पुरस्करांचे वितरण, २४ संस्थासोबत सांमजस्य करार

म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: राज्यातील एकूण ५३ उद्योग घटकांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्य निर्यात पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात ५३ पैकी २० पुरस्कार पटकावून संपूर्ण राज्यात कोकण विभागाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. याच कार्यक्रमात देशातील २४ संस्थांसोबत सामंजस्य करारही करण्यात आले.कोकण विभागात ठाणे विभागात सहा उद्योगांना तसेच रत्नागिरीतील सहा उद्योगांना पुरस्कार मिळाले. रत्नागिरी विभागातील सुप्रिया लाइफ सायन्स लि. या कंपनीला दोन प्रवर्गांत एकूण आठ सुवर्ण पुरस्कार प्राप्त झाले. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधील सुप्रिया लाइफ सायन्सने महाराष्ट्रामध्ये अवल स्थान पटकावले आहे. रायगड विभागातील चार उद्योगांना राज्य पुरस्कार मिळाले तर, पालघर विभागात तीन कंपन्यांना पुरस्कार प्राप्त झाले. सिंधुदुर्ग विभागात एका कंपनीला राज्य पुरस्काराने गौरवण्यात आले.या कार्यक्रमादरम्यान निर्यातदार उद्योजकांची उत्पादने प्रदर्शित करण्यात आली. ज्यामध्ये कोकण विभागातील पाचही जिल्ह्यांच्या नऊ उद्योजकांनी सहभाग घेतला.

PM आवास योजनेतून घराचं स्वप्न साकार; प्रशासनानं बुलडोझर फिरवला, कारवाईची चर्चा; कारण काय?

असे मिळाले पुरस्कार

– ठाणे ः अपर इंडस्ट्रिज लि., कनेक्टवेल इंडस्ट्रिज प्रा.लि., ज्योती स्टील इंडस्ट्रिज, कविश फॅशन प्रा. लि., सचिन्स इम्पेक्स, दलाल प्लास्टिक प्रा. लि.

– रत्नागिरी ः जिलानी मरिन प्रॉडक्ट, कृष्णा अॅन्टी ऑक्सिडन्टस प्रा. लि., अल्काय केमिकल्स प्रा. लि., गद्रे मरिन एक्स्पोर्ट प्रा. लि., एम. के. ए. इंजिनियर्स अॅन्ड एक्स्पोर्टर्स प्रा.लि., मे. सुप्रिया लाइफ सायन्स लि.

– रायगड ः नाईक ओशियन एक्स्पोर्टस् प्रा. लि., कपूर ग्लास इंडिया प्रा. लि., गंधार ऑईल रिफायनरी (इंडिया) लि., एचकेएस इम्पेक्स, प्रा. लि.

– पालघर ः खोसला प्रोफिल प्रा. लि., बिक केमिकल्स अॅण्ड पॅकेजिंग प्रा. लि., ईस्टमन केमिकल
– सिंधुदुर्ग ः अमृता कॅश्यू इंडस्ट्रीज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed