• Mon. Nov 25th, 2024

    कुठेही चिरफाड न करता घशातून माशाचा काटा काढला, दोन महिन्यांपासून होता अडकलेला

    कुठेही चिरफाड न करता घशातून माशाचा काटा काढला, दोन महिन्यांपासून होता अडकलेला

    रत्नागिरी: कोकणात चिपळूण तालुक्यात डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात अनेक अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कॅन्सर रुग्णांसाठी हे रुग्णालय जीवदान ठरलं आहे. अनेक कॅन्सर रुग्ण बरे करण्यात या रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. आता याच रुग्णालयात अशीच एक अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. घशात स्वरयंत्राजवळच अडकलेला माशाचा काटा काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर ट्रस्टचे हे हॉस्पिटल आहे.

    स्वरयंत्राजवळ अडकलेला माशाचा काटा काढण्याची अत्यंत जटील अशी शस्त्रक्रिया नुकतीच डेरवण येथील वालावलकर रूग्णालयामध्ये यशस्वीरित्या पार पडली. रूग्णाच्या घशात दोन महिन्यांपूर्वी माशाचा मोठा काटा अडकला होता. त्यानंतर त्याला गिळताना त्रास होत होता. त्यामुळे घशाला सुज येवून त्याला अन्न गिळता येत नव्हते. चिपळुणा मधील डॉ. ओंकार शर्मा यांनी रूग्णाला वालावलकर रूग्णालयामध्ये एमआरआय आणि सीटी स्कॅन करण्यासाठी पाठवले होते.

    वालावलकर रूग्णालयामध्ये सिटी स्कॅन करताना असे आढळून आले की, घशात माशाचा काटा स्वरयंत्रानजिक अडकलेला आहे. त्यानंतर डॉ. आनंद जोशी (गेस्टएन्ट्रोलॉजिस्ट सर्जन), सर्जरी विभागाचे डॉ. मानसिंग घाटगे (डीन), डॉ. अविनाश गुरूषे (सर्जन), डॉ. संग्राम दाभोळकर (सर्जन) ईएनटी विभागाचे डॉ. प्रतिक शहाणे (ईएनटी सर्जन) यांनी चर्चा करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. स्वरयंत्रानजिक घशामध्ये अडकलेला काटा काढण्याची अत्यंत अवघड अशी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या कुठेही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे पार पडली. या शस्त्रक्रियेत ४ सेंटीमीटर घशात रूतलेला काटा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *