• Mon. Nov 25th, 2024
    घरगुती सामान घेण्यासाठी मुंबईला निघाले, रेल्वे स्लो झाल्याचं समजून उतरण्याचा प्रयत्न, पण…

    सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील भिरवंडे-मुरडवेवाडी येथील रहिवासी आणि कनेडीतील दूरसंचार केबल व्यावसायिक सचिन बाळकृष्ण सावंत (वय ३९) हे बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास एक्स्प्रेसमधून उतरत असताना तोल जाऊन पडल्याने गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांना असं वाटलं की गाडी स्लो होत आहे. त्यामुळे त्यांनी उतरण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांचा तोल गेला त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हरहुन्नरी, मनमिळावू स्वभाव असलेल्या सचिन सावंत यांच्या अपघाती निधनाने भिरवंडे गावावर शोककळा पसरली आहे.सचिन सावंत हे मंगळवारी रात्री काही कामानिमित्त कणकवलीहून मेंगलोर एक्सप्रेसने मुंबईकडे निघाले होते. बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास दिवा रेल्वेस्टेशनवर ते उतरत असताना तोल जावून पडल्याने त्यांच्या पायांना गंभीररित्या दुखापत झाली. त्यांना तात्काळ रेल्वे पोलिसांनी स्थानिकांच्या सहाय्याने नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
    थोरात भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा; विखे म्हणतात, नको! आमच्याकडे हाऊसफुल्ल झालंय
    सचिन सावंत यांच्या अपघाती निधनाने कुटुंबावर मोठा आघात झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गावच्या सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमातही ते नेहमीच अग्रेसर असत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी, भाऊ, वहिनी, काकी असा परिवार आहे. सचिन सावंत यांच्या पार्थिवावर आज सकाळी ८ वा. भिरवंडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *