• Sat. Sep 21st, 2024

टॉवेलने गळा आवळून आजीला संपवलं, दोन नातवांसह सूनेच्या कृत्याने सांगली हादरली, कारण…

टॉवेलने गळा आवळून आजीला संपवलं, दोन नातवांसह सूनेच्या कृत्याने सांगली हादरली, कारण…

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: खानापूर तालुक्यातील पारे येथे जमिनीच्या वादातून ८० वर्षीय वृद्धेचा नातवानीच टॉवेलने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक घटना घडली. ही घटना मंगळवारी घडल्याची माहिती आहे. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संगीता रामचंद्र साळुंखे यांच्या घरी पारे येथे ही घटना घडली, त्या मृत वृद्धेची मुलगी आहे. श्रीमती सखुबाई संभाजी निकम (वय ८०, रा. चिंचणी मंगरूळ) असे मृत झालेल्या दुर्दैवी वृद्धेचे नाव असून याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून अशिष सतिश निकम आणि रेणुका सतिश निकम (दोघेही रा. चिंचणी मंगरुळ ता. खानापूर, जि. सांगली) या दोघांना विटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वृद्धेचा सुनेसह दोन नातवांनीच टॉवेलने गळा आवळून तिचा खून केल्याने खानापूर तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत विटा पोलिस ठाण्यात संगीता रामचंद्र साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, फिर्यादी संगीता साळुंखे यांचा भाऊ सतिश संभाजी निकम यांनी त्यांची निम्मी प्रॉपर्टी जावई कुणाल पाटील यांच्या नावावर करण्याचं फिर्यादींनी सतिश निकम यांना सांगितलं. याचा राग मनात धरुन अशिष सतिश निकम आणि रेणुका सतिश निकम यांनी संगनमत करुन दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी फिर्यादी संगिता रामचंद्र साळुंखे यांच्या घरी येऊन तुझ्या भावाला ४८ तासाची मुदत देतो, तू भावाला बोलावुन घेऊन सदरची प्रॉपटर्टी फिरवुन दे, नाहीतर तुला आणि म्हतारीला ४८ तासानंतर दाखवितो, अशी धमकी दिली होती. त्यानंतर मंगळवारी (२० फेब्रुवारी २०२४) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची आई सखुबाई संभाजी निकमचा प्रॉपर्टीच्या कारणावरुन चिडून जाऊन टॉवेलने गळा आवळून जीवे ठार मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद मेमाणे करीत आहेत.

दरम्यान, प्रॉपर्टीच्या कारणावरुन रागाच्या भरात टॉवेलने गळा आवळून वृद्धेचा खून झाल्याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. या घटनेची माहिती मिळताच तातडीने विटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे हे पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला. तपासाला गती देत विटा पोलिसांनी संशयिताना तातडीने ताब्यात घेतले. खून झालेल्या वृद्धेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विटा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed