• Sat. Sep 21st, 2024
पोलिसांची छापेमारी, तब्बल ३०० कोटींचं ड्रग्ज जप्त, सांगली कनेक्शन समोर

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : पुण्यातील एमडी ड्रग्जचे पाळेमुळे आता सांगलीतील कुपवाडपर्यंत पोहोचले आहेत. पुण्यातील क्राइम ब्रांचने कुपवाडमधून ३०० कोटी रुपयांचे १४० किलो एमडी ड्रग्ज जप्त केलं आहे. या प्रकरणी आयुब मकानदार याच्यासह तिघांना अटक करण्यात आलीय. पुण्यात १९ फेब्रुवारी रोजी काही एमडी ड्रग्जचा साठा पुणे पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी ड्रग्स निर्माण करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. पुणे पोलिसांच्या हाती या ड्रग्ज बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा साठा हाती लागला. त्यानुसार पोलिसांनी पुणे शहर, शिरूर आणि दिल्ली या ठिकाणी छापे टाकले. याच वेळी पुण्यातील ड्रग्ज कनेक्शन सांगलीतील कुपवाडपर्यंत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.पुणे क्राईम ब्रँचने ताब्यात घेतलेल्या पुण्यातील संशितांच्या संपर्कात सांगलीतील आयुब मकानदार असल्याची माहिती मिळाली. तसेच पुणे क्राईम ब्रँचने पुण्यातील संशयितांकडे कसून चौकशी केली असता पुण्यातील ड्रग्स कंपनीमध्ये निर्माण केलेला ड्रग्जचा साठा एका टेम्पोमधून कुपवाड एमआयडीसी मध्ये पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पुणे क्राईम ब्रँचच्या तीन ते चार पथकाने सांगलीतील कुपवाड मध्ये छापा टाकला.
रन आऊट झालेल्यांना बॉलिंग का करायची ;डॉ. अमोल कोल्हे यांचे आढळरावांना सनसनीत उत्तर
यावेळी यापूर्वी ड्रग्ज प्रकरणी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असणाऱ्या व सहा महिन्यापूर्वी कारागृहातून सुटलेल्या आयुब मकानदार याला पुणे क्राईम ब्रँचने कुपवाडमधून ताब्यात घेतले. आयुब मकानदार यांच्याकडे चौकशी केली असता अन्य दोघांची नावे निष्पन्न झाली. पुणे क्राईम ब्रँचने तिघांना ताब्यात घेऊन कुपवाडमधील एमडी ड्रग्जचा तपास सुरू केला. यावेळी आयुब मकानदार व अन्य दोघांनी कुपवाडमध्ये असणाऱ्या स्वामी मळ्यातील दोन लहान खोल्यांमध्ये पुण्यातून आणलेला एमडी ड्रग्जचा साठा ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर या ठिकाणी छापा टाकून पुणे क्राईम ब्रँचने तब्बल १४० किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे ३०० कोटी रुपये आहे.

पुणे क्राईम ब्रँचकडून आयुब मकानदार यांच्यासह तिघांकडे कसून चौकशी सुरू असून पुण्यातून कुपवाडमध्ये आलेला ड्रग्जचा साठा कुठे पाठविण्यात येणार होता? तो कोणाकडे देण्यात येणार होता? याबाबत आता कसून चौकशी सुरू आहे. तसेच कुपवाडमध्ये अन्य काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत छापेमारी सुरू होती.

आयुब मकानदारची पुण्यातील संशितांसोबत ओळख…

आयुब मकानदार याला यापूर्वी ड्रग्ज पुरवठा प्रकरणी अटक करण्यात आली होती. तो या प्रकरणी येरवडा कारागृहामध्ये होता. याचवेळी पुण्यातील ड्रग्ज प्रकरणी अटकेत असणाऱ्या संशयीतांसोबत येरवडा कारागृहातच ओळख झाली होती. त्यानंतर पुण्यातील ड्रग्ज कंपनीमध्ये तयार झालेला एमडी ड्रग्जचा साठा त्याने कुपवाडमधील स्वामी मळ्यामध्ये करून ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed