• Mon. Nov 25th, 2024
    ना भाजप, ना राष्ट्रवादी; जळगाव लोकसभेत ठाकरे विरुद्ध शिंदे लढतीचे संकेत, उमेदवार कोण?

    जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघ युतीमध्ये भाजप तर महाआघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. मात्र, मागील काळात शिवसेना व राष्ट्रवादीतील बंडामुळे अनेक समीकरणे बदलली असून महायुतीत शिंदे गटाने तर आघाडीत ठाकरे गटाने मित्रपक्षांकडे या मतदारसंघासाठी दावा केला आहे. हे दावे मान्य झाल्यास जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात ‘ठाकरे’ विरुद्ध शिंदे सेनेत सामना रंगण्याची शक्यता आहे.

    जळगाव लोकसभा मतदारसंघात केवळ १९९१ च्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना निवडणुकीच्या मैदानात उतरली होती. मात्र, त्यानंतर युतीमध्ये ही जागा भाजपकडेच राहिली आहे. आता शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी ही जागा ठाकरे गटाला मिळाली असल्याचा दावा त्यांनी केला. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघात चार जाहीर सभा घेऊन लोकसभा निवडणुकीचे रणशिंग देखील फुंकले आहे. त्यामुळे सध्या तरी महविकास आघाडीच्या वाटपात जळगावची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता जास्त आहे. शरद पवार राष्ट्रवादी गटातून जळगाव लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी फारसे कुणी उत्सुक नसल्यामुळेही ही शक्यता दाट झाली आहे.
    मनसे-भाजप युती जवळपास निश्चित, लोकसभेच्या दोन जागाही ठरल्या, शिंदेंची सीट राज ठाकरेंना?

    महायुतीत शिंदे गटही जळगावच्या जागेसाठी आग्रही

    भाजप-सेना युती असतांना जळगावची जागा भाजपाकडे होती. सध्या भाजपाचे उन्मेष पाटील विद्यमान खासदार आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा प्रबळ दावा आहे. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख सुनील चौधरी यांनी जळगावची जागा शिंदे गटाला मिळावी यासाठी आग्रह धरला आहे. जळगाव मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार आहेत. तर भाजपचे दोन आमदार आहेत. तर राष्ट्रवादीचे एक आमदार आहेत. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी अशी मागणी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी केली आहे.

    शिंदे अन् ठाकरेंच्या आमदाराची जुगलबंदी

    Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

    तर सेना विरुद्ध सेना जुगलबंदी

    जळगाव लोकसभा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडी व महायुतीने अद्याप स्पष्ट निर्णय जाहीर केलेले नाहीत. मात्र, यात जर या जागा ठाकरे गट व शिंदे गटाला सुटल्या तर ठाकरे शिवसेना विरुद्ध शिंदे शिवसेना अश्या चुरशीच्या लढतीची जुगलबंदी जळगाव लोकसभा मतदारसंघात रंगू शकते.

    महायुतीचा जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाला मिळावी यासाठी आमची पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे. या मतदारसंघात शिंदे गटाची ताकद असल्याने आम्ही दावा केला आहे.

    निलेश पाटील, जिल्हा प्रमुख, शिंदे गट शिवसेना

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed