• Sat. Sep 21st, 2024

मेट्रोच्या प्रकल्पस्थळावरून शेकडो किलो लोखंडी साहित्य गायब; धक्कादायक माहिती समोर, काय घडलं?

मेट्रोच्या प्रकल्पस्थळावरून शेकडो किलो लोखंडी साहित्य गायब; धक्कादायक माहिती समोर, काय घडलं?

मुंबई : मेट्रोच्या मानखुर्द येथील प्रकल्पस्थळावरून शेकडो किलो लोखंडी साहित्य चोरणाऱ्या पाच जणांना ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली. वाहिद खान, शबर शेख, वसीम उल्ला खान, शिवा मंटळ, रशीद कुरेशी अशी अटक आरोपींची नावे असून एका अल्पवयीन आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्यांपैकी काहींवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.
नांदेड आणि दक्षिण मुंबई लोकसभा लढायची, वंचितच्या कार्यकर्त्यांचा निर्धार, पक्षाकडे गळ घातली
मेट्रोचे काम सुरू असल्याने मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरच्या खंडोबा मंदिर येथे लोखंडी साहित्य ठेवण्यात आले आहे. खंडोबा मंदिर साइड येथून मेट्रो पोल उभारण्यासाठी लागणारे लोखंडी क्रिप्स जागेवर नसल्याचे सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आले. चोरीप्रकरणी सुरक्षारक्षकाने ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात धाव घेतली. चोरीचा गुन्हा दाखल केल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक राजेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भाऊसाहेब माळवदकर, सावंत, पाटील, बाविसकर, वाळके यांच्या पथकाने चोरांचा शोध सुरू केला.

जयंत पाटील, विजय वडेट्टीवार भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा, बावनकुळेंचं सूचक वक्तव्य

खंडोबा मंदिर येथून योगयतन जेट्टीकडे जाणाऱ्या कच्चा रोडवरून एक टेम्पो सामान घेऊन गेल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी टेम्पोचालकाला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरून, पोलिसांनी शिवा याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या शिवाने एका अॅपरून टेम्पो बुक केल्याचे सांगितले. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी त्याच्या इतर साथीदारांना अटक केली. त्याने चोरी केलेल्या साहित्यापैकी पोलिसांनी भंगार विक्रेत्याकडून ४६८ किलो भंगार हस्तगत केले. वाहिद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात मानखुर्द आणि देवनार पोलीस ठाण्यात ९, शबरविरोधात मानखुर्द पोलीस ठाण्यात ६, वसीम विरोधात १, शिवाविरोधात ४ गुन्हे दाखल आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed