रायगड: रायगडच्या हिरकणी कड्यावर दोन तरुण अडकले होते. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांची सुटका करण्यासाठी मोठी मदत झाली. रेस्क्यु टीमलाही पाचारण करण्यात आले होते. रामू छोटुलाल यादव (१९) विशाल रामेश्वर थोरात (१८) असे हे दोन तरुण अडकले होते. त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
रोप वेच्या मार्गावरून स्थानिकांनी या तरूणांना पहिल्यानंतर गोंधळ उडाला. गडावर पुन्हा परत जाणे किंवा खाली उतरणे कठीण असल्याने दगडाचा आधार घेत दोघेही थांबले होते. रुमालाने इशारा करून आरडाओरड करत सुटका करण्यासाठी धावा करत होते. हा सगळा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने युद्धपातळीवर स्थानिक ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून त्या दोघांना सुखरूप वाचवले आहे.

महाड तालुका पोलीस ठाणे हद्दीत किल्ले रायगड येथे हिरकणी बुरुज येथे रामु छोटुलाल यादव आणि विशाल रामेश्वर थोरात हे किल्ले रायगड येथे फिरण्यास आलेले होते. दोघे किल्ले रायगड फिरून खाली उतरत असताना रस्ता चुकले. त्यामुळे ते हिरकणी बुरुज येथे अडकल्याने त्यांना स्थानिक शिलेदार रेस्क्यू टीमच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले. या घटनेत त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. अडकलेले हे दोन्ही युवक आता आपल्या घरी सुखरूप परतले आहेत.