• Sat. Sep 21st, 2024
महाराष्ट्रात अवकाळी पाऊस; पुढील आठवड्यात असे असेल राज्यातील हवामान

मुंबई : काही दिवसांपूर्वी मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने झोडपले. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं बऱ्याच प्रमाणत नुकसान झाले. आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी पावसासंदर्भातील एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी अवकाळी पावसासंदर्भातील आहे. गेल्या काही महिन्यांपासून सतत अवकाळी पावसाचे सावट दिसत आहे.गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. या वर्षी देखील गेल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. पण गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. याचदरम्यान, ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यातील हवामानासंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. डख यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पाऊस हजेरी लावणार, असं मत व्यक्त केलं आहे.
लोकसभा निवडणुकीआधी महायुतीला मिळणार आणखी एक साथीदार; राज ठाकरे भाजप सोबत जाणार? का सुरू झाली ही चर्चा
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या ठिकाणी येत्या काही दिवसात गारपीट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संबंधित राज्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता असल्याने आपल्या महाराष्ट्रातही याचा परिणाम जाणवणार असल्याचं डख यांनी सांगितलं आहे. राज्यात २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान पूर्व विदर्भात अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. राज्यातील नागपूर, वर्धा, भंडारा, अचलपूर, अकोट, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, पुसद, हिंगोली, वाशिम आणि बुलढाणा या भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे. पण उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार नाही. दुसरीकडे या कालावधीत मराठवाड्यातील हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

मात्र, मराठवाड्यात पडणारा हा अवकाळी पाऊस खूपच स्वरुपाचा राहणार आहे. तसेच डख यांनी २५ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यानंतर राज्यातील हवामानात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे संभाव्य गारपीटीची शक्यता लक्षात घेता अवकाळी पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

अवकाळी पाऊस हा फक्त पूर्व विदर्भातच पाहायला मिळणार आहे. विदर्भ वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कुठेच अवकाळी पाऊस होणार नाही, असा अंदाजही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. फक्त मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात व आजूबाजूच्या परिसरात तुरळक पावसाची शक्यता आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed