रायगड: जिल्ह्यातील पेण तालुक्यात मनोज पाटील उर्फ बाळा हा चक्क एमडीचे पीकच घेत होता. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याच्या ७ साथीदारांसह मुसक्या आवळत त्याचा हा गोरखधंदा बंद पाडला आहे. या वृत्तानंतर दुसऱ्याच दिवशी नवी मुंबईतून अंमली पदार्थांचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे.
नवी मुंबईत कोपरखैरणे पोलिसांनी धडक कारवाई करत २ वेगवेगळ्या ठिकाणांहून सुमारे ३६ लाख रुपयांचे अंमली पदार्थ ताब्यात घेतले आहेत. यामुळे अंमली पदार्थ तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. कोपरखैरणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांचा चांगलाच दबदबा या परिसरात निर्माण झाला आहे. औदुंबर पाटील गुन्हेगारांचे अक्षरशः कर्दनकाळ ठरत आहेत. वाशी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे पोलिसांनी ३ दिवसांपूर्वी कोपरखैरणे सेक्टर १९ मधील रहिवासी संकुलमधून ३१ लाख ६० हजारांचे एमडी आणि ब्राऊन शुगर जप्त करून यात २ महिला व एका पुरुषाला अटक केली होती.१७ फेब्रुवारीच्या रात्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या आदेशानुसार सागर टकले हे गस्त घालत असताना सेक्टर १० येथील ओमज्योत अपार्टमेंटजवळ एक महिला आणि पुरुष संशयितरित्या आढळून आले. त्यांच्याजवळ चौकशी करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सागर टकले यांनी त्यांचा थरारक पाठलाग करून संतोष मणिराम राठोड (४५) याला ताब्यात घेऊन झडती घेतली.

त्याच्याजवळ ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे, ४५ ग्रॅम वजनाचे ब्राऊन शुगर सापडले. त्याची पत्नी ही अंधाराचा फायदा घेऊन अंमली पदार्थाचा साठ्यासह पळून जाण्यात यशस्वी झाली. त्यानंतर कोपरखैरणे पोलिसांनी धडक कारवाई करत दुसऱ्यांदा साडेचार लाखांचे ब्राऊन शुगर जप्त केले. आतापर्यंत पोलिसांनी ब्राऊन शुगर, एमडीसह २ महिला आणि २ पुरुषांना अटक केली असून फरार महिलेचाही शोध सुरु केला आहे.