• Sat. Sep 21st, 2024
साताऱ्यात धक्कादायक प्रकार, मध्यरात्री पोलिसांचा छापा पडताच नको ते दृश्य समोर

सातारा : पाचगणी- खिंगर येथील पाचगणी टेन्ट हाऊसवर बारबाला नाचवल्याप्रकरणी १० ते १२ बारबालांसह सोलापूर जिल्ह्यातील २४ बी बियाणे विक्रेताडीलर असे एकूण ३५ ते ३६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व अॅडिशनल एसपी आचल दलाल यांनी या पाचगणी टेन्ट हाऊस रिसॉर्टवर छापा टाकून कारवाई केली. या घटनेनं सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये पाचगणी टेन्ट हाऊस रिसॉर्टचे मालक डॉ. विजय दिघे आंबेघर (ता. जावळी) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.काल रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पाचगणी टेन्ट हाऊस रिसॉर्टचे मालक डॉ. विजय दिघे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रात्री उशिरापर्यंत पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दोन महिन्यापूर्वी देखील पाचगणी येथीलच कासवंड येथे स्प्रिंगव्हॅली या रिसॉर्टवर देखील अशाच पद्धतीच्या बारबाला नाचवल्या गेल्या होत्या. यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पाच डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची पाचगणी येथील पाचगणी टेन्ट हाऊस या रिसॉर्टवर मोठे कारवाई मानली जात आहे.
जयंत पाटील यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा, ऑफिसमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांकडे बोट दाखवून म्हणाले…
काल रात्री साडेदहाच्या सुमारास सातारा पोलीस यांची टीम या रिसॉर्टवर पोहोचली. या रिसॉर्टवर सुरू असणाऱ्या छमछमवर सातारा पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये रिसॉर्टच्या आत असणाऱ्या १२ बारबाला व सोलापूर जिल्ह्यातील कृषी खत विक्री व्यवसायिक असे एकूण ३६ जणांना पोलिसांनी चौकशी करून ताब्यात घेतलं आहे. बाकी काही खत विक्री व्यवसायिक व बारबालांसह डान्स करणारे पाच ते सहा जण घटनास्थळावर आलिशान गाड्या सोडून पळून गेले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed