• Mon. Nov 25th, 2024

    शहर अस्वच्छ करणाऱ्यांना दणका, नागपूर महापालिकेने ठोकला ९८ हजार रुपयांचा दंड

    शहर अस्वच्छ करणाऱ्यांना दणका, नागपूर महापालिकेने ठोकला ९८ हजार रुपयांचा दंड

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर कारवाई केली. शुक्रवारी आणि शनिवारी या दोन दिवसांत १३८ जणांकडून ९८ हजार ५०२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

    -महापालिकेने स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

    -शुक्रवारी सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत ४ प्रकरणांची नोंद करून ८०० रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

    एक लाख मोतिबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट, राज्यभरात उद्यापासून विशेष मोहीम, सामान्यांना विनामूल्य सुविधा

    -तसेच हातगाड्या, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजीविक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता केल्याने ३० जणांकडून १२ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

    -व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ६ प्रकरणांची नोंद करून ६०० रुपयांची वसुली केली.

    -दहा दुकानदारांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकल्याने त्यांच्याकडून ४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

    -रस्त्यावरच मंडप, कमान, स्टेज इत्यादी उभारून अथवा वैयक्तिक कामाकरिता रस्ता बंद केल्याने ७ जणांकडून २३ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

    कचरा उठाव नियोजनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले

    -चिकन सेंटर, मटण विक्रेते यांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा येथे कचरा टाकल्याने त्यांच्याकडूनही दंड वसूल करण्यात आला.
    -शुक्रवारी ८३ प्रकरणांत ५९ हजार १०२ आणि शनिवारी ५५ प्रकरणांत ३९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *