• Mon. Nov 11th, 2024

    मी एका बाजूला, सगळं पवार कुटुंब दुसरीकडे; अजितदादांच्या भावनिक आवाहनावर काकांचे खडे बोल

    मी एका बाजूला, सगळं पवार कुटुंब दुसरीकडे; अजितदादांच्या भावनिक आवाहनावर काकांचे खडे बोल

    बारामती : उमेदवार कोणी असेल निवडणुकीत मतदारांची साथ मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण संपूर्ण कुटुंबातील लोक एका बाजूला आहेत आणि मी फक्त बाजूला आहे, याचा अर्थ लोकांना स्वतःच भावनात्मक करण्याचा व भावनिक राजकारण मांडून त्यांची सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो, अशा शब्दात शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनावलं. गोविंदबागेत आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

    भावनात्मक आवाहन आणि भावनिक राजकारण आमच्याकडून करण्याचा प्रश्नच येत नाही, आम्ही ते करतच नाही.‌ त्याचं कारण असं की बारामतीकर आम्हाला वर्षानुवर्ष ओळखतात. त्यामुळे आमच्याकडून भावनात्मक आवाहन करता येणार नाही, त्याची आवश्यकता नाही, पण ज्या पद्धतीने विरोधकांकडून भूमिका मांडली जात आहे, ती पद्धत, त्यांची भाषणे ही काहीतरी वेगळं सुचवत आहेत. त्याची नोंद बारामतीचे मतदार निश्चितपणे घेतील आणि योग्य तो निर्णय घेतील त्याची मला खात्री आहे, असं शरद पवार म्हणाले.
    शिवसेनेच्या कार्यक्रमात स्थानिक खासदार भावना गवळीच अनुपस्थित; म्हणतात बिन बुलाये मेहमान, कशी जाऊ?
    काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पणदरे आणि बारामतीतील पाटस रस्त्यावरील वृंदावन लॉन्स येथील बुद्ध कमिटी मेळावा व शेतकरी संवाद मेळाव्यामध्ये बोलताना बारामतीकरांना उद्देशून आपल्याला कुटुंबाकडून एकटे पाडले जात आहे, मात्र बारामतीकरांनी मला एकटे पाडू नये असे भावनिक आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत शरद पवार यांना हा प्रश्न विचारला त्यावेळी शरद पवार यांनी वरील उत्तर दिले.
    काँग्रेस रक्तात, मरेपर्यंत पक्ष सोडणार नाही, भाजपला संपवणार, प्रणिती शिंदे आक्रमक

    राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करताना जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केला. दोन्ही पवारांमध्ये जे अंतर पाडले ते जितेंद्र आव्हाड यांनी पाडले आणि जयंत पाटील व सुप्रिया सुळे यांना बाजूला सारत जितेंद्र आव्हाड हे पुढे जाण्याचा प्रयत्न आहेत असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. यासंदर्भात शरद पवार यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी या आरोपाचे खंडन केलं.

    माझ्या घरातील सगळे माझ्याविरोधात, फक्त तुम्हीच माझ्यासोबत

    ते म्हणाले अजिबात नाही, धनंजय मुंडे जे बोलले आहेत त्यांचा राष्ट्रवादीमधील कालखंड जो गेला त्यापेक्षा कितीतरी अनेक वर्ष आव्हाड हे पक्षासाठी काम करत आहेत. त्यांनी देश पातळीवर काम केले. राज्य पातळीवर काम केले. संस्थात्मक पातळीवर काम केले, असं शरद पवार म्हणाले.
    Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

    महाराष्ट्राच्या विधिमंडळातही काम केले आहे. राज्य मंत्रिमंडळामध्ये सुद्धा त्यांनी काम केले आहे. त्यामुळे पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांनी कोणतीही वेगळी भूमिका त्यांनी घेतली असं नाही. जितेंद्र आव्हाड यांनी काय बोलावं, याचं मार्गदर्शन अन्य लोकांनी करण्याची गरज नाही असा टोला त्यांनी मुंडे यांना लगावला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed