• Sat. Sep 21st, 2024

मिहानमध्ये अजून एका आयटी कंपनीचे आगमन; क्लिक टू क्लाउड कंपनी स्वत:चे युनिट करणार सुरू

मिहानमध्ये अजून एका आयटी कंपनीचे आगमन; क्लिक टू क्लाउड कंपनी स्वत:चे युनिट करणार सुरू

नागपूर: नागपूरंच नव्हे तर विदर्भाच्या दृष्टीने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या मिहानमध्ये अजून एका आयटी कंपनीचे आगमन होत आहे. लवकरच मिहानमधील सेझ अर्थात विशेष आर्थिक क्षेत्रात क्लिक टू क्लाउड ही आयटी कंपनी स्वत:चे युनिट सुरू करत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मिहानमध्ये आयटी कंपन्यांद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. एचसीएल, टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा या चार मोठ्या आयटी कंपन्यांचे युनिट मिहानमध्ये यशस्वीरित्या सुरू आहेत.
अवकाळीचे दाटले ढग; काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल
एकीकडे मिहानमध्ये डिफेन्स एव्हिएशन क्षेत्रातील कंपन्या याव्यात यासाठी प्रयत्न सुरू असतानाच आयटी कंपन्यांचे आगमन दिलासादायी ठरत आहे. याच अंतर्गत येत्या काळात मिहान-सेझमध्ये क्लिक टू क्लाउडचे युनिट सुरू होत आहे. प्राप्त माहितीनुसार, कंपनीने सेझमध्ये दीड एकर जागा घेतली आहे. या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत मिश्रा आहेत. मिहानमध्ये या युनिटद्वारे १५० ते २०० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. क्लिक टू क्लाउड ही कंपनी क्लाउड-आधारित उत्पादने आणि सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. क्लाउड कार्यक्षमता ऑप्टिमाइझ करणे, तिचे व्यवस्थापन यासाठी कंपनी काम करते. या कंपनीचे जगभरात शंभरहून अधिक क्लाइंट आहेत. येत्या २५ फेब्रुवारीला या युनिटचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

अभिनय करणारे न्यायाधीश, वकील आणि राहुल नार्वेकर यांची अभिव्यक्ती अराजकता माजवणारी | असीम सरोदे

मायक्रोसॉफ्टला सेवा देणारी कंपनी

क्लिक टू क्लाउडचे अस्तित्व आजघडीला यूएसए, चीन, जापान,ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, कुवैत, फिनलँड, थायलँड, व्हिएतनाम, फिलिपाइन्स, कतार, बहरीन, नेपाळ, इंडोनेशिया, ओमान, सिंगापूर, स्वित्झर्लंड, हाँगकाँग, दुबई, मलेशिया, मेक्सिको, कॅनडा येथे आहे. कंपनीद्वारे क्लाउड सेवा पुरविल्या जाणाऱ्यांमध्ये सर्वात मोठी कंपनी मायक्रोसॉफ्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed