लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. लोकसभेची तयारी ही भाजप आणि काँग्रेस पक्षाने सुरू केली, दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याचा खासदार कोण होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. कारण कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेले रवींद्र धंगेकर पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा होती. मात्र कसबा विधानसभेत पराभवाचा मोठा धक्का बसलेल्या भाजपला वचपा काढण्यासाठी लोकसभा जिंकणं हे प्रतिष्ठेचा विषय झालं आहे. उमेदवारी बाबत भाजपने सावध पवित्रा घेत गुप्तता पाळली आहे.
लोकसभेबाबत काँग्रेस पक्षही तयारीला लागला आहे. अशोक चव्हाण यांनी पक्षाला रामराम केल्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी हालचाल सुरू झाली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय शिबीर देखील लोणावळाला पार पाडत आहे. दरम्यान आमदार रवींद्र धंगेकर यांनी लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
कसब्यात धंगेकर पॅटर्न असे पोस्टर छापून धंगेकर यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रदूषण मुक्तीसाठी पुन्हा धंगेकर पॅटर्न, तर भयमुक्त होण्यासाठी पुन्हा धंगेकर पॅटर्न असे दोन पोस्टर व्हायरल केले आहेत. याबाबत आमदार रवींद्र धंगेकर यांना विचारला असताना धंगेकर म्हणाले, भारतीय जनता पार्टीने नागरिकांच्या पायाभूत सुविधांकडे कोणतेही लक्ष दिलेला नाही. आणि पुण्यात वाढत असलेल्या ड्रग्ज माफियामुळे तरुणाई हे बेरोजगारी आणि गुन्हेगारीकडे तर वळालीच आहे, असा आरोप धंगेकरांनी केला.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
धंगेकर पॅटर्न यासाठी की कसबा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने त्यांची पूर्ण ताकद लावली होती. पैशाचं मोठ्या प्रमाणात वाटप केलं होतं. तरीसुद्धा लोकांनी धंगेकर यांनाच विजय प्राप्त करून दिला म्हणून हाच पॅटर्न सुद्धा लोकसभेत राबवावा अशी नागरिकांची इच्छा आहे. म्हणून त्याला आपण धंगेकर पॅटर्न असं म्हटलं आहे.