• Sat. Sep 21st, 2024
चिपळूणमध्ये जाधव आणि राणेंमध्ये जोरदार राडा, नेमकं काय घडलं? भास्कर जाधवांनी घटनाक्रम सांगितला

रत्नागिरी, चिपळूण: भाजप नेते नीलेश राणे आणि उद्धव ठाकरे गटातील भास्कर राणे यांच्यात काल गुहागरमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी दगडफेकदेखील झाली. या दगडफेकीत नीलेश राणे यांच्या ताफ्यातील काही गाड्यांच्या काचादेखील फुटल्या. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जाधवांच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. या राड्याप्रकरणी पोलिसांनी जवळपास ४०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या राडाप्रकरणावर उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यापूर्वी सगळा घटनाक्रम बघावा. असे काहीतरी घडू शकते याची आम्ही पोलिसांना आधीच कल्पना दिली होती. मात्र, नीलेश राणे यांची सभा गुहागरला असताना त्यांनी माझ्या कार्यालयासमोर वाट्टेल ते पोस्टर लावले. सभेसाठी गुहागरला जाण्यासाठी नीलेश राणेंना दोन रस्ते असताना ते मुद्दाम चिपळूनमध्ये आले. तसेच वेगवेगळे टीजर प्रसारित करत दंगल घडविण्याची वातावरण निर्मिती केली होती असे जाधव म्हणाले.

…तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरी येऊन भांडी घासावी! रामदास कदमांचं थेट आव्हान
पोलीस रस्त्यावर असतानादेखील निलेश राणे यांनी माझ्या कार्यालयासमोर सत्कार घ्यायचा आहे, धिंगाणा करायचा अशी भूमिका घेतली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखून धरलं. यानंतर त्यांनी पायी चालत मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोलिसांनी त्यांचे सत्कार, स्वागत कार्यक्रम करुन त्यांना गाडीत कोंबून गुहागरला रवाना करायला पाहिजे होते. पोलिसांनी आपले कर्तव्य केले असते तर पोलीस निश्चितपणे हा प्रकार टाळू शकले असते असे जाधव यांनी म्हटले आहे

निर्भय बनो कार्यक्रमाआधी राडा, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला

राणेंनी रस्ता रोखून धरेपर्यंत पोलीस बरोबर होते मात्र त्यानंतर त्यांच्यावर वरून दबाव आला. निलेश राणे आणि त्यांचे कार्यकर्ते रस्ता ओलांडून माझ्या कार्यालयाच्या बाजूला आल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला आहे. तसेच पोलिसांनी आणखी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करावेत असे आव्हान भास्कर जाधव यांनी दिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed