• Sat. Sep 21st, 2024

स्नॅक्सच्या रॅपरचं तुम्ही काय करता? पुण्यातील तरुणाचा भन्नाट प्रयोग, प्लास्टिकपासून बनवला नवाकोरा गॉगल

स्नॅक्सच्या रॅपरचं तुम्ही काय करता? पुण्यातील तरुणाचा भन्नाट प्रयोग, प्लास्टिकपासून बनवला नवाकोरा गॉगल

पुणे : रस्त्यारस्त्यांवर वेफर्स, फ्रायम्स, कुरकुरे खाऊन टाकली जाणारी प्लास्टिकची पर्यावरणासाठी धोकादायक असलेली ‘रॅपर्स’ (मल्टिलेयर्ड प्लास्टिक) गॉगलच्या आणि चष्म्याच्या फ्रेम्स बनवण्यासाठी कामी येत आहेत. पुण्यातील नवउद्योजक अनिश मालपाणी या तरुणाने आपल्या पेटंट प्रलंबित तंत्रज्ञानातून प्लास्टिक रॅपरपासून गॉगल, चष्मे तयार करण्याचे ‘विदाउट’ या नावाने स्टार्टअप सुरू केले आहे.

‘पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या घटकांशिवाय, असा संदेश ‘विदाउट’ या नावातून मालपाणी यांनी दिला आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांनी प्लास्टिकच्या रॅपरपासून गॉगलची निर्मिती करण्याच्या तंत्रज्ञान विकसित केले असून, त्याच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. भोसरी येथील प्रयोगशाळेत मल्टिलेयर्ड प्लास्टिकवर प्रक्रिया करून, आकर्षक गॉगल आणि चष्म्याच्या फ्रेम्सची निर्मिती सुरू आहे. सध्या महिन्याला एक ते दीड हजार गॉगलची निर्मिती क्षमता असून, या वर्षात ही क्षमता दहा पटींनी वाढवण्याचा मालपाणी यांचा मानस आहे.

‘खाद्यपदार्थांच्या रॅपरमध्ये मल्टिलेयर्ड प्लास्टिकचा वापर होतो. त्याची विल्हेवाट लावता येत नाही. म्हणून एका तंत्रज्ञानाद्वारे मशीनचा आधार घेऊन त्याचे प्लास्टिक आणि रॅपर्समध्ये असलेले अॅल्युमिनियमचे घटक याचे वर्गीकरण केले जाते. त्यातून तयार झालेल्या सॉलिड प्लास्टिकचा वापर चष्म्याच्या फ्रेम तयार करण्यासाठी केला जातो,’ असे मालपाणी यांनी सांगितले. यामुळे मोठ्या प्रमाणावर तयार होणारा प्लास्टिकचा कचरा नद्या-नाले आणि समुद्रांमध्ये जाण्यापासून वाचेल, असा दावा त्यांनी केला.

अजित पवारांच्या खासदारकीपासून पदांचा पाढा वाचला, चुका काढल्या; जितेंद्र आव्हाडांचं तोडीस तोड प्रत्युत्तर

प्लास्टिक रॅपरचे संकलन

– रस्त्यावरचे प्लास्टिक रॅपर गोळा करण्यासाठी कंपनीकडून शहरातील कचरावेचकांची मदत घेतली जाते.
– प्लास्टिक रॅपर गोळा करून दिल्यास कचरावेचकांना प्लास्टिकच्या वजनानुसार पैसे दिले जातात.
तीन वर्षांपासून आम्ही हा व्यवसाय सुरू केला असून, यामध्ये रस्त्यावर गोळा होणाऱ्या प्लास्टिकचा पुनर्वापर करणे, हे आमचे ध्येय होते. आमच्याकडे असलेल्या तंत्रज्ञानाने ते शक्य झाले आणि त्यातून गॉगल, चष्म्याच्या फ्रेम तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली.- अनिश मालपाणी, संचालक, ‘विदाउट’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed