• Fri. Nov 15th, 2024
    Atal Setu: अटल सेतू आज-उद्या १४ तासांसाठी राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग…

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अट सेतूवर (एमटीएचएल) द टाइम्स ऑफ इंडिया आणि एमएमआरडीए यांच्या सहयोगाने रविवार १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ‘लार्सन आणि टुब्रो सी-ब्रिज मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अटल सेतू शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकवर १७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. तसेच अटल सेतूवरून ये-जा करणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गावरून जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

    अटल सेतू शिवडी-न्हावा शेवा सी लिंकवर १८ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ ते दुपारी १२ या कालावधीत होणाऱ्या मॅरेथॉनला कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, तसेच हा कार्यक्रम सुरळीत पार पडावा, यासाठी या सी-लिंकवर १७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या कालावधीत उरणकडून अटल सेतूवरून जाणाऱ्या वाहनांना गव्हाण फाटा, उरण फाटा, वाशी मार्गे पुढे इच्छित स्थळी जाण्यासाठी पर्याही मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

    मुख्यमंत्री न आल्याने शिवसेनेच्या महाअधिवेशन स्थळावरून संभाजी भिडे माघारी फिरले

    पुण्याहून अटल सेतू मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाने बेलापूर, वाशी मार्गे पुढे इच्छित स्थळी जाता येणार आहे. तसेच जुना मुंबई-पुणे हायवे व कोकणातून येणाऱ्या वाहनांना तसेच पनवेलकडून येणाऱ्या वाहनांनादेखील गव्हाण फाटा, उरण फाटा, वाशीमार्गे पुढे इच्छित जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

    जेएनपीटीकडून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांना गव्हाण फाटामार्गे उलवे, आम्र मार्ग, वाशी खाडीपुलामार्गे मुंबईकडे इच्छित स्थळी जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या वाहतूक नियंत्रण अधिसूचनेतून पोलिस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच मॅरेथॉनमधील वाहनांना वगळण्यात आले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed