• Sat. Sep 21st, 2024

नवीन वर्षाच्या पहिल्या दीड महिन्यातच साडेतेरा लाखांची लाचखोरी, २० जणांवर कारवाई, एसीबीसमोर आव्हान

नवीन वर्षाच्या पहिल्या दीड महिन्यातच साडेतेरा लाखांची लाचखोरी, २० जणांवर कारवाई, एसीबीसमोर आव्हान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: नाशिक विभागात सन २०२३ मध्ये सर्वाधिक १६० सापळे रचून २७४ लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. मात्र, सन २०२४ मध्ये लाचखोरीत काहीशी घट झाल्याच्या नोंदी आहेत. दीड महिन्यांत साडेतेरा लाख रुपयांची लाच घेणाऱ्या वीस संशयितांवर एसीबीने कारवाई करून गुन्हे नोंदविले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी असली, तरी वर्षभर लाचखोरीला आळा घालण्याचे आव्हान एसीबीसमोर आहे.

राज्यातील नोंदीनुसार सन २०२४ मध्ये जानेवारी महिन्यांत ५३ सापळ्यांत ७७ संशयितांना अटक झाली. तर सन २०२३ मध्ये जानेवारीत ५९ सापळ्यांत ८१ संशयित अडकले होते. चालू वर्षी फेब्रुवारी महिन्यात २६ सापळ्यांत ४२ संशयितांना अटक करण्यात आली त्या तुलनेत मागील वर्षी फेब्रुवारीत ३६ सापळ्यांत ५२ संशयितांना पकडण्यात आले होते. दरम्यान, सन २०२३ मध्ये विविध शासकीय विभागांमध्ये झालेल्या लाचखोरीमुळे राज्यात ७८६ सापळे रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक हजार ९८ संशयितांवर गुन्हे नोंदवले होते. त्यापैकी सर्वाधिक १६३ गुन्हे नाशिक परिक्षेत्रात होते. त्यामध्ये २७४ संशयितांचा समावेश होता. तर एका शिक्षण अधिकाऱ्यावर अपसंपदेचा गुन्हा नोंद झाला होता. नाशिकमध्ये सन २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये लाचखोरीत ३७ गुन्ह्यांची वाढ झाल्याचे दिसून आले.

या विभागांत लाचखोरी
शिक्षण, महावितरण, महसूल, पोलिस, लेखा-कोषागार, आदिवासी विकास, वजन व मापे, भूमी अभिलेख, सहकार, जिल्हा परिषद

दीड महिन्यातील मोठे सापळे
– नंदूरबारमध्ये संशयित ग्रामसेवक मनोज पावरा आणि खासगी व्यक्ती लालसिंग वसावे यांना अटक. रोजगार हमी योजनेच्या कामांचे मोजमाप करून देयके देण्यासाठी सहा लाख ४७ हजारांची लाच घेतली.
– नाशिक सहकार विभागातील संशयित सहकार अधिकारी भीमराव जाधव व वरिष्ठ लिपिक अनिल घरडे यांना अटक. एका तक्रारीचा सोसायटीच्या बाजूने निकाल देण्यासाठी पाच लाख घेतले.
– जळगावमध्ये महावितरणचा कंत्राटी वायरमन संशयित प्रशांत जगताप यांनी वीज मीटर बसवून देण्यासाठी एक लाख घेतले.

परिक्षेत्रनिहाय कारवाई : जानेवारी ते ११ फेब्रुवारी
जिल्हा – सन २०२४ – सन २०२३
नाशिक – ६ – ८
अहमदनगर – १ – ४
नंदुरबार – २ – २
जळगाव – ३ – ५
धुळे – ३ – २
एकूण – १५ – २१

लाचखोरीची कारवाई : जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२४ (कंसात संशयित)
मुंबई – ४ (७)
ठाणे – १२ (१९)
पुणे – १४ (२०)
नाशिक – १५ (२०)
नागपूर – ९ (११)
अमरावती – ५ (५)
छत्रपती संभाजीनगर – १६ (३४)
नांदेड – ३ (३)
एकूण – ७९ (११९)

तक्रार करायची आहे? सायबर कॅफेत जा, माजी रणजीपटूला स्वारगेट पोलिसांचे अजब उत्तर, तक्रार घेण्यास नकार

राज्यातील नोंदी
सापळे – ७९, संशयित ११९
अपसंपदा – २, संशयित ५
लाचेची रक्कम – ४६ लाख ८२ हजार शंभर रुपये

राज्यानुसार संशयितांची वर्गवारी
वर्ग १ अधिकारी – ७
वर्ग २ अधिकारी – १०
वर्ग ३ कर्मचारी – ६७
वर्ग ४ कर्मचारी – ६
इतर व खासगी व्यक्ती – २९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed