• Sat. Sep 21st, 2024
पालिकेत शिक्षकांची महाभरती; एकूण १,३४२ पदे भरणार, जाणून घ्या भरती प्रक्रिया

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ होत असताना त्या तुलनेत शिक्षकांची संख्या कमी आहे. शिक्षकांची ही संख्या भरून काढण्यासाठी पालिकेच्या शाळांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यमांसाठी एक हजार ३४२ शिक्षकांची महाभरती करण्यात येणार आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सर्वेक्षण झाले, आता प्रशिक्षण; परीक्षांच्या दिवसात माध्यमिक शिक्षक पुन्हा वेठीला
पालिका शाळांमध्ये मागील काही वर्षांत शिक्षकांची भरती झालेली नाही. प्राथमिक शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने चार माध्यमांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या शिक्षण विभागामार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमीळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा आठ भाषिक माध्यमांच्या शाळा चालवल्या जातात. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुमारे एक हजार १२९ शाळांमध्ये मिळून सध्या तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. करोनाच्या साथीनंतर पालिका शाळांतील पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण विभागाने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

सीबीएसईच्या शाळा, अन्य बोर्डांच्या शाळा, शैक्षणिक वस्तूवाटप यामुळेही विद्यार्थी संख्या वाढली आहे. या भरतीसाठी राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. शिक्षण विभागाने भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवारांना १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर छाननी करून मग त्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. पालिकेच्या शिक्षण विभागामार्फत कागदपत्रांची पडताळणी करून मग त्यांना नियुक्ती पत्र दिले जाईल, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

फारुकी फर्मान पाहिलं, राज ठाकरे म्हणाले हे तर अजित पवार बोलतात तसं लिहिलंय, ना स्वल्पविराम ना उद्गारवाचक चिन्ह !

माध्यम आणि पदे

इंग्रजी – ६९८

हिंदी – २३९
मराठी – २१६
उर्दू – १८९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed