मुलींना मोफत शिक्षण
परभणीला एका मुलीने आत्महत्या केली होती आणि चिठ्ठीत लिहिले होते की पैसे नाही शिक्षणासाठी, त्यामुळे संवेदनशील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व जात, पंथ, धर्मच्या मुली आता शिक्षण घेऊ शकतात. यामुळं मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
जळगावच्या चाळीसगावातील भाजपचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांचा गोळीबारात मृत्यू झाला होता. याबाबत विचारलं असता त्यांनी चाळीसगावच्या माजी नगरसेवकाच्या मृत्यू बाबत मला अधिक माहिती नाही, हल्ला झाला माहीत होते पण अपुऱ्या माहितीवर बोलणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारी घटना या चिंताजनकच आहे, सरकार त्याबाबत सतर्क आहे, असंही ते म्हणाले.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचं पत्र आल्याबाबत विचारलं असता चंद्रकांत पाटील यांनी राज्यात जे काही सुरू आहे ते अनाकलनीय आहे, शांतपणे सर्व पक्षांनी एकत्र बसून त्याचा विचार करणे आवश्यक आहे, असं म्हटलं. धमकीबाबत दखल घेण्यासाठी सरकार सक्षम आहे, असं पाटील म्हणाले.
निखिल वागळे हे पंतप्रधानांबाबत इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलले तर त्यांच्यावर श्रद्धा असलेल्या माणसांकडून प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. हा संताप लक्षात घेऊन वागळेंनी नीट बोलावं, बोलण्याचा पण काही स्तर असतो पद्धत असते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे यांचा कुणबी नोंदीचा मुद्दा मार्गी लागला असेल, मागासवर्ग आयोग काम करत तर त्यांनी आता उपोषणाला बसण्याची आवश्यकता वाटत नाही, असं म्हटलं.
रश्मी शुक्ला नक्की काय म्हणाल्या हे ऐकावं लागेल, एखादा अधिकारी किंवा नेत्याला वेगळं बोलायचं असतं आणि तुम्ही कधी वेगळा अर्थ घेता, असंही ते म्हणाले.