पोलिसांनी कोठेही राजकीय हस्तक्षेप होत असेल तर त्याला बळी पडू नका :
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असून गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी मठाधिपती गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी, वैद्यकिय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांनी पारंपारिक पद्धतीने अजित पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी गावकऱ्यांचे आभार मानत उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कोल्हापूरचा चौथा दौरा आहे.
स्वागत करताना काही गावकरी पायात फुलांच्या पाकळ्या टाकायचे तर काहीजण हळूच पाकळ्यांनी मारायचा प्रयत्न करत होते, असं अजित पवार म्हणाले. राज्यात बिघडत चाललेल्या कायद्यावर सुव्यवस्था यावर देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले असून विरोधक आरोप करतात, सरकारची बदनामी करतात. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे हे खरं आहे. मात्र कोणीही मोठ्या बापाचा असला तरी कारवाई होईल. कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न आम्ही करू, असं अजित पवार म्हणाले. पोलिसांनी कोठेही राजकीय हस्तक्षेप होत असेल तर त्याला बळी पडू नका. महिलांना रस्त्यावरून फिरताना सुरक्षित वाटलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
आम्ही वचनपूर्ती करणारे लोक आहोत पोकळ आश्वासन देणारे नाही :
आम्हाला आणखी खूप काही काम करायचं असून त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे असे यावेळी अजित पवार म्हणाले आहेत.
तसेच सत्ता येत असते सत्ता जात असते सत्तेचा ताम्रपट कोणी घेऊन जन्माला आला नाही. दीड दोन वर्ष करोनामुळे आम्ही अडचणीत आलो होतो. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मला निधी द्यायचा होता. मात्र, नागरिकांना वाचवणे ऑक्सिजन प्लॅट उभा करणे या सारख्या अनेक वैद्यकीय गरजेच्या वस्तूंना निधी द्यावा लागला, असं अजित पवार म्हणाले.
काही राजकीय घडामोडी घडल्या त्यानंतर आम्ही विचार केला की आजच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाय देशाला पुढे नेणारा नेता कोणी दिसत नाही. त्यांनी अनेक विकास कामे केली यामुळे आम्ही त्यांच्यासोबत गेलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह नाव झेंडा हे आम्ही पुढे न्यायचं ठरवला आहे. आम्ही वचनपूर्ती करणारे लोक आहोत पोकळ आश्वासन देणारे नाही. या पक्षात काम करताना दुसऱ्याचे मन न दुखवता काम करण्याचा आमचा हेतू असतो, असं अजित पवार यांनी सांगितलं.
इतर कोणत्याही समाजाला त्रास न होता मराठा समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीची भूमिका आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी केली. काही शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिलं मात्र काही शेतकरी वंचित राहिले आहेत. चालू वर्षात पडलेला दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळें लोकसभेच्या आचारसंहिता सुरू व्हायच्या आत ५० हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या अकाऊंटला पाठवायचा प्रयत्न सुरू आहे. मी देखील शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो आहे,असे अजित पवार म्हणाले आहेत.