राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह आणि नाव अजित पवार यांना मिळाल्यानंतर, शरद पवार गटाच्या समर्थकांकडून मोठा संताप व्यक्त होताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे बॅनर पुण्यात लागले आहे होते. यानंतर पुण्यामध्ये शरद पवार समर्थक विरुद्ध अजित पवार समर्थक असा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली होती. शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कार्यकर्त्याना अजित पवार यांच्या विरोधात कोणत्या ही प्रकारचे निषेधाचे प्रकार करू नये, असं आवाहन केलं होता. मात्र, काल सकाळी पुन्हा शरद पवार समर्थकाने बॅनर लावत अजित पवार समर्थकांना डिवचले आहे.
ढवळ्या आणि पवळ्या अल्लेख करुन संदीप काळे यानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटो असणारा बॅनर लावला होता. संदीप शशिकांत काळे असं फ्लेक्स लावणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव आहे.
संदीप काळे म्हणाले की, शरद पवारांनी १९९९ साली राष्ट्रवादी पक्षाची स्थपना केली होती, त्यानंतर अनेक नेते शरद पवारांनी घडवले त्यामधले एक अजित पवार आहेत. शरद पवार यांनी अजित पवारांना अनेक पद दिली आहेत. ज्या प्रकारे एकनाथ शिंदे याने पक्ष फोडून शिवसेना चोरली, त्याच प्रकारे अजित पवार यांनी सुद्धा पक्ष फोडत शरद पवार यांचा पक्ष चोरला आहे. म्हणून एक ढवळ्या आणि दुसरा पवळ्या असा उल्लेख केल्याचं संदीप काळे म्हणाले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News