• Sat. Sep 21st, 2024
आई वडिलांचा सांभाळ न  करणाऱ्यांना दणका, नरवाड ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय,काय ठरलं?

सांगली : जिल्ह्यातील नरवाड गावच्या ग्रामसभेत आई- वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना त्यांच्या स्थावर मालमत्तेवर वारस न लावण्याचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेने हा एकमुखी निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीकडे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने सरपंच मारुती जमादार यांनी हा विषय ग्रामसभेत मांडला होता. याला ग्रामसभेने मंजुरी दिली, असा निर्णय घेणारी नरवाड ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. नव्या पिढीकडून आई-वडिलांचा सांभाळ करण्यास टाळाटाळ होतो. आई वडिलांना स्वतःच्याच घरातून बाहेर काढण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने हा ठराव मंजूर केला.

मिरज तालुक्यातील नरवाड ग्रामपंचायत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २६ जानेवारी रोजी गावची ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेमध्ये नरवाड गावाने एकमताने ऐतिहासिक असा निर्णय घेतला आहे. गावात राहणाऱ्या वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना आता त्यांच्या स्थावर संपत्तीच्या वारसा नोंद मधून बेदखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत ग्रामसभेत या ठराव मान्यता देत, एक मताने सर्वच गावकऱ्यांनी याला मंजुरी दिली आहे.

आपली मुलं आपल्याला सांभाळत नाही,अशा तक्रारी अनेक आई-वडिलांनी ग्रामपंचायतीकडे केल्या होत्या.आई-वडिलांना घरातून बाहेर काढण्यासारखे प्रकार देखील घडले होते.त्याचबरोबर काही वृद्ध आई-वडिलांनी बाबत त्यांच्या मुले व सुनांकडून योग्य तो सांभाळ न करता टाळाटाळ करण्यात येत असल्याच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या. अशा या परिस्थितीमध्ये काहीतरी सकारात्मक पाऊल उचलण्याचा निर्धार करत आई-वडिलांचा सांभाळच मुलांकडून होणार नसेल, तर त्या आई-वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलांच्या वारसा कश्यासाठी हवा,या विचाराने जी मुलं आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करणार नाही, त्यांना त्यांच्या आई वडिलांच्या स्थावर मालमत्तेमध्ये वारसा नोंद घालता येणार नाही. तसेच त्यांना शासनाच्या ज्या काही लाभाच्या योजना आहेत,त्या मिळू शकणार नाही.तसेच रेशन धान्य दुकानांमधून देखील त्यांना धान्य न देण्याबाबतचा निर्णय घेण्याचे ठरवलं आणि तसा ठराव ग्रामपंचायतीच्या २६ जानेवारी रोजी पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये सादर करण्यात आला.

हत्तीच्या अनाथ पिल्लाला मिळाली आई; दुधवा व्याघ्रप्रकल्पात फुलले नवीन नाते
ग्राम सभेमध्ये एकमताने हा निर्णय मंजूर करण्यात आला. गावकऱ्यांनी ग्रामसभेला हजेरी लावली होती आणि गावाने एक मुखाने मंजूर देखील केला आहे. एखाद्या मुला आई-वडिलांकडून मुलाचा सांभाळ होत नसेल आणि त्यांनी तक्रार दिल्यानंतर त्यांच्या शेतजमिनी मधील देखील वारसा कमी करण्याबाबत तलाठीकडे शिफारस देखील ग्रामपंचायतचे माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतीच्या आई वडीलांच्या सांभाळ करण्यामध्ये किमान सुधारणा होईल तसेच गाव पातळीवर ग्रामपंचायतच्या निर्णयाचं स्वागत सर्व स्तरातून करण्यात आल्याचं सरपंच मारुती जमादार यांनी सांगितले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी पाचव्यांदा समन्स धुडकावलं, आम आदमी पार्टीनं कारण सांगितलं, ED काय करणार?

विधानसभेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी देखील या ग्रामपंचायतीचे कौतुक केला आहे. ग्रामपंचायतीला लागेल ती मदत करण्यात येईल तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये हा निर्णय घेण्यात यावा यासाठी देखील पाठपुरावा करण्यात येईल येणाऱ्या अधिवेशनात देखील हा ठराव मांडण्यात येईल आणि त्याला मंजुरी देखील घेण्यात येईल असे पत्र नीलमताई गोऱ्हे यांनी सरपंचांना दिलं आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
NCP Crisis : कुटुंबाचे झाले नाहीत, ते देशाचे काय होतील? अंत जल्द आयेगा; सोनिया दुहान यांचा अजितदादा गटाला इशारा

निवडणूक आयोगाचा निर्णय आमच्यासाठी दिवाळीपेक्षाही मोठी मेजवानी, बारामतीतील अजित दादांचे कार्यकर्ते आनंदात!

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed