• Sat. Sep 21st, 2024

कमी विजेसाठी ‘टाटा’चे दुप्पट दर, टाटा पॉवरकडून प्रस्तावित वाढ, उच्च मागणीतही किंचित वाढ

कमी विजेसाठी ‘टाटा’चे दुप्पट दर, टाटा पॉवरकडून प्रस्तावित वाढ, उच्च मागणीतही किंचित वाढ

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील जवळपास साडे सात लाख ग्राहकांना वीज पुरविणाऱ्या टाटा पॉवर कंपनीने घरगुती ग्राहकांसाठी उच्च मागणी असलेल्या ग्राहकांना चालू वीजदरांच्या तुलनेत १ रुपया प्रतियुनिटहून कमी दरवाढ प्रस्तावित केली आहे. मात्र, कमी वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना सध्याच्या वीजदरांच्या दुप्पट दर द्यावा लागण्याची शक्यता आहे.

टाट पॉवर कंपनीने २०२४-२५साठी नवीन दरांचा प्रस्ताव आयोगाकडे सादर केला आहे. त्यामध्ये घरगुती वापरासाठीच्या दरांत सध्यापेक्षा २०२४-२५ साठी कंपनीने ० ते १०० वीज वापरासाठी १२१.६६ टक्के, १०१ ते ३०० युनिट वीज वापरासाठी ५३.३१ टक्के, ३०१ ते ५०० युनिट वीज वापरासाठी ९.३१ टक्के व ५०० युनिटहून अधिक वीज वापरासाठी २.३९ टक्के दरवाढीचा मूळ प्रस्ताव आयोगाकडे सादर केला आहे. यावर आता पुढील काळात जनसुनावणी होऊन त्यानंतर अंतिम दर आयोगाकडून घोषित होतील. हे दर १ एप्रिल २०२४ पासून अंमलात येतील. यानुसार कमी वीज वापर असलेल्यांच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. मात्र, अधिक वीज वापर असलेल्यांसाठीची दरवाढ कमी आहे.

‘दर संरचनेला तर्कसंगत बनवण्यासाठी सर्व निवासी विभागांमध्ये दरांत थोडी वाढ करण्याचे आम्ही सुचवले आहे. पण हे फक्त प्रस्तावित दर आहेत आणि याबाबतचा अंतिम निर्णय महाराष्ट्र वीज नियामक आयोग घेईल, जो आमच्या ग्राहकांच्या हिताचा असेल’, असे कंपनीचे म्हणणे आहे.

ललित कला केंद्रातील तोडफोडीवेळी कडक कारवाई नाही, पुण्यात पोलीस उपनिरीक्षक निलंबित

२०२० च्या आदेशानुसार मात्र दरवाढ कमी

वीज वितरण कंपन्यांची दरनिश्चिती ही पंचवार्षिक असते. यानुसार, सन २०२०-२१ ते २०२४-२५ साठीची दरनिश्चिती १ एप्रिल २०२० रोजी झाली. याच दरांचा २०२३-२४मध्ये मध्यकालीन आढावा घेऊन त्यानुसार नवे दर प्रस्तावित करण्याची मुभा कंपन्यांना होती. त्यानुसार, मुंबईसह राज्यभर वीज वितरण करणाऱ्या चारही कंपन्यांचे नवे दर १ एप्रिल २०२३पासून लागू झाले होते. त्यात दर महागडे असल्याने त्यावर स्थगिती आणावी, अशी टाटा पॉवरने वीज अपीलेट लवादाकडे (अॅप्टेल) मागीलवर्षी याचिका केली होती. त्यानुसार, अॅप्टेलने टाटा पॉवरच्या २०२३-२४च्या दरांना अंतरिम स्थगिती दिली व २०२०-२१साठीचे दरच २०२३-२४साठी लागू करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे २०२३-२४मध्ये टाटा पॉवरच्या मुंबईतील साडे सात लाख ग्राहकांसाठी वीज दर वेगवेगळ्या श्रेणीत १४ ते ३१ टक्क्यांनी घटले होते. त्या तुलनेत आताचे प्रस्तावित दर अधिक आहेत. मात्र याच २०२० च्या आदेशात २०२४-२५ साठीचे दर घोषित झाले होते. त्या तुलनेत आत्ताची दरवाढ कमी आहे.

सन २०२४-२५साठी प्रस्तावित प्रतियुनिट दर असे (वीज शुल्क + वहन आकार)

(किरकोळ घरगुती रहिवाशांसाठी)

श्रेणी (युनिट) चालू २०२० आदेशान्वये प्रस्तावित टक्के वाढ

०-१०० ३.३४ ६.५३ ७.३७ १२१.६६

१०१-३०० ५.८९ ९.०३ ९.०३ ५३.३१

३०१-५०० ९.३४ १२.२३ १०.२१ ९.३१

५०० अधिक १०.०४ १२.८३ १०.२८ २.३९

आपली मुंबई ही सिरीया बनण्याच्या उंबरठ्यावर; अनधिकृत मदरसे अन् मशिदींचा मुद्दा, नितेश राणे तापले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed