म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने जाहीर केलेल्या अधिसूचनेविरोधात आता पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाला आहे. याचेच पडसाद शनिवारी अहमदनगर येथे पार पडलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात उमटले असून ही अधिसूचना म्हणजे फक्त ओबीसी नव्हे तर एससी एसटीच्या आरक्षणावरही घाला घालणारी असल्याची टीका भाजप आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तर त्याचवेळी या अधिसूचनेविरोधात भीमसैनिकांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
राज्य सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेत काही दिवसांपूर्वीच अधिसूचना जाहीर केली. या अधिसूचनेविरोधात राज्यभरातील ओबीसी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करतानाच या अधिसूचनेचा विरोध करण्यासाठी शनिवारी अहमदनगर येथे ओबीसी एल्गार मोर्चोचे आयोजन करण्यात आले होते. या अधिसूचनेविरोधात अनेक ओबीसी नेत्यांनी या मेळाव्यात नाराजी व्यक्त केल्यानंतर आता भाजपाचे आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनीही याबाबत आपला विरोध दर्शविला. त्याचवेळी गोपीचंद पडळकर यांनी सरकारला धारेवर धरत जरांगे यांच्यावरही सडकून टिका केली.

या अधिसूचनेला विरोध करताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, “सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत काढलेली सूचना केवळ ओबीसींच्याच हक्कावर गदा आणते असा काहींचा समज झाला आहे. परंतु तसे नाही. ही अधिसूचना एससी एसटीच्या आरक्षणावर घाला घालणार असल्याची टीका पडळकर यांनी यावेळी केली.
ते पुढे म्हणाले की, “रामोश-बेरड, बेडर यात विवाह होतात. ते सगे सोयरे आहेत. काही अनुसुचित जातींमध्ये येतात तर काही महाराष्ट्रात भटके विमुक्तात येतात. पण सगळ्या रामोशी बांधवांना एससीचे प्रमाणपत्र देता येत नाही, याकडे त्यांनी यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधले. या सर्व प्रकरणांवर प्रकाश टाकतानाच गोपीचंद पडळकर यांनी याविरोधात आता भीमसैनिकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले असल्याने येत्या काळात आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.