निलेश पाटील, जळगाव: रावेर लोकसभेची जागा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाकडे होती. महाविकासआघाडीत या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दावा केला जात होता. रावेर हा मतदारसंघ स्थापन झाल्यापासून काँग्रेसनं लढवलेला आहे. काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे भाजपवासी झाल्याने या मतदारसंघात काँग्रेसकडे तगडा उमेदवार नसल्याचं चित्र निर्माण झालंय. रावेर लोकसभेतील बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर ही जागा काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता असल्याचं बोललंं जातंय.
गेल्या अनेक दिवसांपासून रावेर लोकसभेच्या जागेवरुन कॉंग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटात रस्सीखेच होती. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. उल्हास पाटील यांनी काँग्रेसचं रावेर लोकसभेची जागा लढवणार असल्याचे वारंवार सांगितले होते. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी सुद्धा रावेरची जागा ही राष्ट्रवादी शरद पवार गट लढवेल आणि पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी निवडणूक लढवणार असल्याचं म्हणत वारंवार त्यांच्या मनातील इच्छा बोलून दाखवली होती.
काँग्रेसच्या जागेवर दावा करणारे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे भाजपवासी झाल्याने आता काँगेस पक्षाकडे प्रभावी उमेदवार नाही. त्यामुळे रावेरची जागा ही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आल्यास आमदार एकनाथराव खडसे हे उमेदवार असू शकतात.

या संदर्भात आज मुंबई येथे महाविकास आघाडीची जागा वाटपा संदर्भात बैठक आहे या बैठकीत लोकसभेच्या जागा वाटपा संदर्भात चर्चा होणार असून रावेरची जागा ही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाणार का हे पाहावं लागेल.
रावेर लोकसभेवर २०१४ पासून एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे या खासदार आहेत. भाजप या निवडणुकीत खासदार रक्षा खडसे यांचे तिकीट कापणार असल्याची चर्चा आहेत. या तसे संकेत वेळोवेळी भाजपाचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहेत.
रावेरमध्ये भाजप रक्षा खडसेंना पुन्हा संधी देणार की नवा उमेदवार देणार हे पाहावं लागणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात एकनाथ खडसे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. उमेदवारी निश्चित होई पर्यंत या मतदारसंघात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News