• Sat. Sep 21st, 2024
नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर; वाचा नेमकं प्रकरण

चंद्रपूर: नितेश राणे यांनी पोलीस माझं काही वाकडं करु शकणार नाही, आपला बॉस ‘सागर’ बंगल्यावर बसला आहे. तुम्ही कार्यक्रम करा, तुम्हाला सुखरूप घरी पोहचवण्याची जबाबदारी आमची असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. माळशिरसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदू आक्रोश मोर्चात राणे बोलत होते. राणे यांच्या वक्तव्याचा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी चांगलाच समाचार घेतला.
आपल्यासमोर कोणीही शेठ फेट चालत नाही; सगळ्यांचे गेट बंद, निलेश राणेंचा भास्कर जाधवांवर निशाणा
वडेट्टीवार म्हणाले की, कुणी कुणाचा बाप असू दे, मात्र बापाने बापाची भूमिका बजावली पाहिजे. महाराष्ट्रातील सत्ताधारी जर कुणी बाप बनत असेल तर त्याला आम्हाचा सलाम आहे. मात्र त्या बापाने महाराष्ट्रातील सर्व मुलं समान आहेत असं वागावं. एका मुलाला वेगळा न्याय, दुसऱ्या मुलाला वेगळा न्याय असेल तर तो बाप लायक आहे काय? हा खरा प्रश्न येतोय. आमची भूमिका एवढीच आहे की, खुर्चीवर बसलेल्या बापाने सर्वांना समान न्याय द्यावा ही आमची अपेक्षा आहे. आज वडेट्टीवार चंद्रपुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.

कायदा बनलाय, जवळपास आरक्षण मिळालंय, मराठे जिंकून आलेत : मनोज जरांगे पाटील

पुढे वडेट्टीवार म्हणाले, नितेश राणेनी जी भूमिका मांडली आहे, की आमचा बाप सागर बंगल्यावर बसला आहे. आमचं कुणी वाकडं करु शकणार नाही. बंगल्यावर बसलेले मालगुजर आणि बाप हे दीर्घकाळ टिकत नसतात. ना बंगले टिकतात ना बंगल्यात बसलेले बाप टिकतात. सत्ता ही समाजासाठी आहे. विशिष्ट समाजाला टारगेट करण्यासाठी सत्तेचा वापर कराल तर सत्तेच्या मुकुट घालून कुणी परमनंट बसलेला नाही हे लक्षात ठेवा. सत्ता गेली की त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. हे लक्षात ठेवून आपण काय बोलतो याचे भान ठेवायला हवे, असे वडेट्टीवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed