• Mon. Nov 25th, 2024

    आपल्यासमोर कोणीही शेठ फेट चालत नाही; सगळ्यांचे गेट बंद, निलेश राणेंचा भास्कर जाधवांवर निशाणा

    आपल्यासमोर कोणीही शेठ फेट चालत नाही; सगळ्यांचे गेट बंद, निलेश राणेंचा भास्कर जाधवांवर निशाणा

    रत्नागिरी: गेले अनेक दिवस शांत असलेले भाजपाचे युवा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी खेड तालुक्यातील लोटे येथील भगवान महाराज कोकरे यांच्या गोशाळेच्या विषयावरून ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांना टीकेचं लक्ष केले आहे. कोकरे महाराज काळजी करू नका, कोणीही इकडे शेठ फेट आपल्यासमोर चालत नाही. सगळ्यांचे गेट बंद..सोडणार नाही.. असे सांगत निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना सुनावले आहे. खेड तालुक्यात लोटे येथे भगवान कोकरे महाराज यांच्या राष्ट्रीय गोशाळेच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

    राणे पुढे म्हणाले की, कोकरे महाराज तुम्ही काळजी करू नका, असे सांगत देवाची कृपा होती अचानकपणे हे माझ्याकडे आले. वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. या सगळ्या वारकरी संप्रदायाला मी एकत्र करतो, असे मला सांगितले. एका मोठ्या वारकरी संप्रदायाच्या एका कार्यक्रमाला मला इथे बोलावलं कधी एक रुपयाची मागणी केली नाही. माणसाने अशा शब्दात गोशाळा चालक कोकरे महाराज यांचे त्यांनी कौतुक केलं. भगवान कोकरे महाराज गोसेवा करत आहेत. त्यांना नाही मदत करायची तर कोणाला करायची असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
    RSS सोबत खास संबंध; भाजप-जेडीयू सरकारमध्ये मंत्री, जाणून घ्या बिहारचे नवे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांच्याबद्दलतुम्हाला हवय काय जमीनच ना नाही देत जा. ही जमीन गाईंसाठी आहे. गाईंच्या रक्षणासाठी आहे. हे इतर कोणत्याही कामासाठी आम्ही ही जमीन जाऊ देणार नाही, अशी मागणी आम्ही केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हे प्रस्तावही वर गेले आहेत. म्हणून कोकरे महाराज तुम्ही काळजी करू नका, कोणी शेठ फेट आपल्यासमोर चालत नाही. सगळ्यांचे गेट बंद अशा शब्दात भाजपाचे युवा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना सुनावले आहे.

    भास्कर जाधव यांची ॲक्शन करत कॅमेरा सुरू झाले की मी निखारा, असा टोला भास्कर जाधव यांना लगावत म्हणाले की, मी निखारा नाही विझवला ना तुला एक दिवस… हा निखारा या जन्मातच विझवणार. राणेंना दुसरा जन्मच माहिती नाही. जे करणार ते याच जन्मातच करणार. सोडणार नाही, असा असं थेट आव्हानच निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना दिले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचा उल्लेख करत मी साठे यांना सांगितलं पक्षाला सांगा मला प्रभारी करा. मी उद्यापासून सामान घेऊन येतो गुहागरमध्ये आणि याला पुन्हा घरी पाठवू, अशा शब्दात राणे यांनी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर तोफ डागली आहे.

    कायदा बनलाय, जवळपास आरक्षण मिळालंय, मराठे जिंकून आलेत : मनोज जरांगे पाटील

    आपण सोज्वळ माणूस आहे. वाकूनच काम करतो. तुम्ही हसताय असं काही नाही. पण जिथे वाकडा आहे तिथे तडजोड नाही. हे राणे साहेबांचे संस्कार आहेत. जिथे शब्द चालत नाही तिथे बाकीचे सगळे उपाय पण लोकांना न्याय दिलाच पाहिजे. जनतेपर्यंत न्याय हा पोहोचलाच पाहिजे त्याच्याशिवाय पर्याय नाही, असं सांगत गोशाळा चालवणाऱ्या भगवान कोकरे महाराज यांना निलेश राणे यांनी आश्वस्त केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *