• Sat. Sep 21st, 2024
प्रेम प्रकरणात वाद, ओयोमध्ये महिला इंजिनिअरची गोळ्या घालून हत्या, पुणे आयटी पार्कमधील घटना

पुणे (पिंपरी) : पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरात असणाऱ्या एका ओयो हॉटेलमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. काल शनिवारी रात्री गोळ्या झाडून ही हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हिंजवडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणात एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. वंदना द्विवेदी असं मृत महिलेचं नाव असून या प्रकरणात ऋषभ निगम नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी आयटी पार्कमध्ये एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली वंदना द्विवेदी कामाला होती. ऋषभ निगम आणि तिचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते, अशी माहिती समोर येत आहे. दोघेही लखनऊ येथील राहणारे असून गेल्या दोन दिवसांपासून ते या हॉटेलमध्ये राहत होते. मात्र, काही कारणावरून त्यांचे वाद झाले असावे. त्या वादातून ऋषभ याच्याकडे बंदूक असल्याने त्याच बंदुकीतून त्याने येथील ओयो हॉटेलमध्ये वंदना हिची गोळ्या घालून हत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्या केल्यानंतर ऋषभ निगम मुंबईला फरार झाला. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी मुंबई पोलिसांना कळवले. मुंबई पोलिसांनी त्याला नाकाबंदी दरम्यान बंदुकीसह अटक केली.

२१ वर्षांनंतर नव्या विंडीज संघाने ऑस्ट्रेलियाचा मायदेशात केला पराभव, ब्रायन लारा यांना अश्रू अनावर
प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असल्याची माहिती देखील समोर आली असली तरी पोलिसांकडून ही घटना रात्री किती वाजता घडली? हत्येचं नेमकं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. हिंजवडी परिसरात बाहेरच्या राज्यातील अनेक तरुण तरुणी नोकरीनिमित्त येतात. त्यात आजच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दाऊद, छोटा शकीलला शिवसेनेने पळवून लावले, तेथे तुम्ही कोण? राष्ट्रवादीचे नगरचे आमदार संजय राऊतांच्या निशाण्यावर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed