• Mon. Nov 25th, 2024
    जय श्रीराम म्हणत सोडले धरणातून पाणी, निळवंडे उजव्या कालव्याची चाचणी‌‌ यशस्वी, ६९ गावांना लाभ

    अहमदनगर : नगर जिल्ह्यातील प्रवरा नदीवरील निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी झाली. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचा मुहुर्त साधून महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सोमवारी या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. यापूर्वी डाव्यात कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते.
    अखेर ठरलं! उल्हास पाटलांचा कन्येसह भाजपात प्रवेश निश्चित; ‘या’ दिवशी करणार पक्षप्रवेश
    त्यानंतर उजव्या कालव्याची चाचणी झाली. ८४ किलोमीटर असलेल्या उजव्या कालव्याचा अकोले, संगमनेर आणि राहुरी तालुक्यातील ६९ गावांना याचा लाभ होणार आहे. यावेळी दीड टीमसी पाणी सोडण्यात येणार आहे. विखे पाटील म्हणाले, अनेक वर्षे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण आता पाण्याची प्रतिक्षा संपली आहे. डाव्या कालव्या प्रमाणेच उजव्या कालव्याला पाणी मिळाल्याने दोन्ही कालव्यावरील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या पुढाकाराने वरच्या भागातील कालव्यांच्या कामांना सुरूवात झाल्यामुळेच पाणी शेवटच्या गावाला मिळण्यात यश आले असल्याचेही विखे पाटील म्हणाले.

    लाभ क्षेत्राातील तालुक्याची समृध्दता या प्रकल्पामुळे असल्याचे सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण झाले. तो दिवस आपल्या सर्वासाठी ऐतिहासिक असा होता. आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते रामलल्लांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेदिवशी उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा असल्याचेही विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यानंतर तालुक्यातील काही गावात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या या नुकसान भरपाईचा प्रस्ताव महामंडळाच्या नियामक मंडळाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

    श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा आनंद, अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांकडून महापूजा

    शेतकऱ्यांना दळवळणासाठी कालव्यावर १२३ लोखंडी पुलाची मागणी असून या प्रस्तावास तातडीने मान्यता देण्यासाठी पाठपुरवा करण्याची ग्वाहीही विखे पाटील यांनी यावेळी दिली. डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या वेळी दिलेल्या शब्दाची पूर्ती आज या निमित्ताने करण्यात येत आहे. ८४ किलोमीटर असलेल्या या उजव्या कालव्याचा अकोले, संगमनेर व राहुरी तालुक्यातील ६९ गावांना याचा लाभ होणार आहे. उजव्या कालव्यातून दीड टीमसी पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचे सांगत यामुळे लाभक्षेत्रातील कोरडे पडलेले पाझर तलाव, विहिरी, ओढे भरून घेण्यात येणार आहेत. माजी मंत्री मधुक पिचड यांनी धरण आणि कालव्यांच्या कामाच्या वाटचालीचा आढावा घेत अनेकांच्या त्यागाने प्रकल्प उभा राहिला असल्याचे सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed