• Mon. Nov 25th, 2024

    डांबर प्लांटमुळे शेतकऱ्यांचे नुकसान; उत्पादन घटल्याने आर्थिक फटका, आत्मदहन करण्याचा दिला इशारा

    डांबर प्लांटमुळे शेतकऱ्यांचे नुकसान; उत्पादन घटल्याने आर्थिक फटका, आत्मदहन करण्याचा दिला इशारा

    धुळे: शेतकरी राजा नेहमीच अस्मानी संकटात सापडत असताना त्याला फक्त आठवण होती ती शासनाच्या मदतीची. शासन आपल्याला काहीतरी मदत करेल आणि त्यातून आपण योग्य त्या दिशेने शेती करू. आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करू, अशा आशेवर शेतकरी असल्याचे आपण नेहमी बघतो. मात्र धुळे तालुक्यातील गोराणे येथे असलेल्या डांबर प्लांटमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.
    घरात गॅसचा स्फोट; माय-लेकराचे एकमेकांना कवटाळलेल्या अवस्थेत मृतदेह, पोलिसांचेही डोळे पाणावले
    धुळे तालुक्यातील गोराणे गावातील संतोष पाटील शेतकऱ्याने एकरी आठ ते दहा क्विंटल वांग्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ दीड ते दोन क्विंटल इतकेच उत्पादन सध्या येत आहे. त्याला कारणही कसे आहे गोराणे गावातील एका खाजगी जागेत सुरू असलेल्या डांबर प्लांटमुळे उत्पादनावर परिणाम झाल्याने शेतकरी चांगला चिंतेत सापडला आहे. त्यामुळे आता शेतकरीची ही चिंता प्रशासन दूर करेल का? असा प्रश्न शेतकरी उपस्थित केला आहे.

    ज्या दिवशी त्यांच्याकडून शिव्या पडतात ना, तेव्हा वाटतं चला बरोबर बाण लागलेला आहे : आदित्य ठाकरे

    या डांबर प्लांटला ग्रामपंचायत आणि प्रशासनाची कोणतीही परवानगी नसल्याचा दावा देखील शेतकऱ्याने केला आहे. डांबर प्लांट मालकाकडे तक्रार केली असता त्याने कोणतीही दाद दिली नाही, अशी माहिती देखील तक्रारदार शेतकऱ्याने दिली आहे. हा डांबर प्लांट बंद करून होणारे नुकसान थांबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. डांबर प्लांटमुळे होत असलेल्या प्रदूषणामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed