• Mon. Nov 25th, 2024

    गावकरी चूक समजताच म्हणाला सॉरी, तू माझी प्यारी प्यारी… म्हणत अजितदादांनी सगळ्यांनाच हसवलं

    गावकरी चूक समजताच म्हणाला सॉरी, तू माझी प्यारी प्यारी… म्हणत अजितदादांनी सगळ्यांनाच हसवलं

    बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक भाषणासाठी सर्वत्र परिचित आहे. असाच एक प्रसंग बारामती तालुक्यातील सुपे येथे पुन्हा एकदा अनुभवास मिळाला. पाणी टंचाईसाठी बारामती तालुक्यातील सुपे येथे आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार यांनी कोणत्या गावासाठी किती निधी उपलब्ध करून दिला आहे. याची यादी वाचून दाखवत होते. यावेळी एक गावकरी उभा राहिला आणि म्हणाला की ‘दादा पाणी योजनेत माझ्या गावाचं नावच नाही. त्यावर पवार म्हणाले, अरे बाबा तुझ्या गावाचं नाव आहे. असं म्हणत त्यांनी पुन्हा यादी वाचून दाखविली.
    आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधवांची मुंबईकडे कूच; मार्गावर मुस्लिम समुदायाकडून फुलांचा वर्षाव अन् पायघड्या
    यादी वाचून दाखवताच त्या नागरिकाच्या गावाचा उल्लेख होताच तो नागरिक सॉरी सॉरी म्हणत खाली बसला. त्यावर हजरजबाबीपणा असणाऱ्या अजित पवारांनी तू माझी प्यारी प्यारी म्हणत उत्तर दिले आणि यावेळी एकच हशा पिकला. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामती तालुक्यातील सुपे येथे पाणीटंचाई बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला बारामती तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील सर्व नागरिक उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलने जोरदार फटकेबाजी केली.
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपण दोघेच अयोध्याला जाण्याऐवजी एक वेगळा दिवस निवडून सर्व मंत्रिमंडळाला घेऊन जाऊया. कारण २२ तारखेला तेथे प्रचंड गर्दी होणार आहे. महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने प्रभू रामचंद्राचे दर्शन घेऊ, असेही पवार यावेळी म्हणाले. या बैठकीत एकाने उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे कायमस्वरूपी पाणी द्या अशी चिठ्ठी दिली. यावर बोलताना पवार म्हणाले की, मागे एकदा असंच पाणी द्या पाणी द्या.. म्हणत चुकून एक शब्द बोलला गेला.. पार वाट लागली.. माध्यमांकडे असं म्हणत माध्यमांकडे हात करत हे बसलेलेच असतात कुठं दादा सापडतोय… कुठला शब्द कुठे सापडतोय. एवढाच धंदा यांचा, असेही पवार यावेळी म्हणाले.

    सिनेमाचा समाजावर मोठा प्रभाव, पोलिसांनी टायरमध्ये घेतल्यावर फायरच होईल; पुण्यात अजित पवारांची टोलेबाजी

    २८८ आमदारात सर्वात जास्त काम मी करतो. सुपा परिसरातील जिरायती भागात ६५३ कोटींची कामे झाली आहेत. त्यातील काही सुरू आहेत. काही जणांनी सांगितलं मुंबईला बोलावलं काही मुंबईच्या हातात नाही सर्व या हातात आहे, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed