• Sat. Sep 21st, 2024
विद्यार्थिनी म्हणाली- IAS व्हायचंय, मोदी म्हणाले, आम्हाला सलाम ठोकावा लागेल…!

नाशिक : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘जन मन कार्यक्रमा’तर्गत इगतपुरी तालुक्यातील कावनई येथे दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला. भारती रण आणि भाऊसाहेब रण या एकलव्य शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी त्यांनी गप्पा मारल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठेपणी तुला काय बनायचं आहे असा प्रश्न विचारला. त्यावर विद्यार्थिनीने मला आयएएस अधिकारी बनायचे आहे, असं उत्तर दिलं. त्यावर लगोलग तुला आम्हाला सलाम ठोकावा लागेल, असं मिश्किलपणे मोदी म्हणाले. मोदींच्या हजरजबाबीपणाला यावेळी उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली.

जन मन कार्यक्रम अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील विद्यार्थ्यांशी मोदींनी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारती रण आणि भाऊसाहेब रण या एकलव्य शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी मराठीतून संवाद साधला. मी नुकताच नाशिकला येऊन गेला, तुम्हाला माहिती आहे का? काळाराम मंदिरातही स्वच्छता केली? आपल्याला माहिती आहे का? असे प्रश्न त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले.

राईट हँडला शिंदे, लेफ्ट हँडला फडणवीस, पाठीशी अजितदादा; नाशिकच्या रोड शोमध्ये मोदींच्या कारला ‘ट्रिपल इंजिन’
यावेळी विद्यार्थ्यांनी देखील त्यांना पीएम जनमन योजनेत पक्क्या घरांसह वीज जोडणी आणि वसतिगृह योजनेसह विविध योजनांचा लाभ झाल्याची माहिती दिली. पाच ते सात मिनिट चाललेल्या या संवादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिश्किल प्रश्नही केले. या संवादाच्या कार्यक्रमासाठी महराष्ट्रातून नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्याची निवड करण्यात आली होती. इगतपुरी तालुक्यात असलेल्या कावनई येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सात राज्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला.

मोदींच्या खांद्यावरुन शाल घसरली, शिंदेंनी अलगद सावरली, पंतप्रधानांची प्रतिक्रिया लाखमोलाची, पाहा व्हिडिओ
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमादरम्यान या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना मराठीत देखील प्रश्न केले. आम्हाला पंतप्रधान मोदी यांचा मराठीतून केलेला संवाद भावल्याचं विद्यार्थ्यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितलं.

मोदींचा नाशिकच्या विद्यार्थिनीशी संवाद; IAS होण्याचं स्वप्न ऐकून म्हणाले, आम्हाला सलाम करावा लागेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed