यासाठी त्यांनी प्रथम इंटरनेटवरून माहिती मिळवली. त्याचा अभ्यास केला. आर.के. व्हाईट व्हरायटीला पॉईंट चांगला असल्याने ही व्हरायटी लावायचा निर्णय घेतला. मात्र या लागवडीबाबत त्याच्या देखभाली संदर्भात माहिती नसल्याने द्राक्षाची आर. के. व्हरायटीचे निर्माते सांगली येथील रघुनाथ केदारी यांच्याकडून माहिती जाणून घेतली. लागवडीपासून पीक काढणी पर्यंतची इथेभूत माहिती केदारी यांच्याकडून जाणून घेतली. या माहितीच्या आधारावरून आम्ही गेल्या पाच वर्षांपूर्वी द्राक्ष बागेची लागवड केली.
आम्ही दोघेही उच्चशिक्षित असल्याने आम्हाला इंटरनेटवर सर्च करून आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांशी संपर्क करून द्राक्ष एक्सपोर्ट करतो. मागील हंगामात स्पेन, युरोप, जर्मनी, दुबईसह आदी भागातून आलेल्या मागणीनुसार पुरवठा केला. सध्या चालू हंगामात पश्चिम बंगाल या ठिकाणी माल एक्सपोर्ट झाला आहे, अशी माहिती देवकाते बंधूंनी दिली. आम्ही दोघं उच्चशिक्षित भावांनी एकत्रित येत. द्राक्ष पिकाकडे वळालो. यासाठी आमच्या बंधूंनी प्राध्यापकाची नोकरी सोडली. चालू हंगामात निसर्गावर मात करून सध्या आम्ही द्राक्षाचे चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहोत. सध्या मी २ एकर क्षेत्रात आर.के तर १ एकर क्षेत्रात कृष्णा द्राक्ष व्हरायटीची लागवड केली आहे. यातून सुमारे २५ टन माल अपेक्षित असून जवळपास २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे सतीश देवकाते यांनी सांगितले.
मी एका विद्यालयात शारीरिक शिक्षक निरीक्षक या पदावर नोकरीवर कार्यरत होतो. पगारही बऱ्यापैकी मिळत होता. मात्र द्राक्ष बागेची लागवड केल्यानंतर नोकरी पेक्षा शेती व्यवसायात जास्त फायदा होत असल्यामुळे मी नोकरी सोडली. सध्या दीड एकर क्षेत्रात आर.के व्हरायटी द्राक्षाची लागवड केली आहे. तर १ एकर क्षेत्रात कृष्ण व्हरायटी द्राक्षाची लागवड केली आहे. यातून सुमारे १५ टन माल अपेक्षित असून जवळपास १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार, असल्याचे दीपक देवकाते यांनी सांगितले.