• Mon. Nov 25th, 2024

    ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची भेट, उदय सामंत म्हणतात, विकासासाठी आम्ही एकत्र…

    ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची भेट, उदय सामंत म्हणतात, विकासासाठी आम्ही एकत्र…

    रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्षाचे खासदार विनायक राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते, मंत्री उदय सामंत एकत्र भेटले आणि राजकीय वर्तुळात चर्चेला एकच उधाण आलं. दोघांची भेट नेमक्या कुठल्या कारणावरुन झाली, याची चर्चा दबक्या आवाजात सुरु असतानाच सामंतांनी बॉम्ब टाकणारं वक्तव्य केलं. “आम्ही विकास कामासाठी एकत्र असतो” असं उदय सामंत म्हणताच वेगळीच कुजबूज रंगली.

    महसूल कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी रत्नागिरी येथे उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री उदय सामंत हे दोघेही एकत्र आले होते.

    मिलिंद देवरा सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा; उदय सामंत म्हणतात, जरुर या, मुंबईत शिवसेना वाढेल
    हा विषय अवघ्या जिल्ह्यात चर्चेचा ठरला. यावेळी विनायक राऊत यांनी आपण महसूल कर्मचारी क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी आलो असल्याचे स्पष्ट केले.

    महाविकास आघाडी सोडली, पण दापोलीत ठाकरेंसोबत अजितदादा गटाची सत्ता कायम, कार्यकर्ते संभ्रमात
    यावेळी पत्रकारांनी विकास कामासाठीही भविष्यात एकत्र येणार का? असे विचारले असता, उदय सामंत यांनी आम्ही विकास कामासाठी एकत्र असतो. एकसंघपणाने काम करतो. पक्षाचे विचार वेगवेगळे असू शकतात, पण जिल्ह्याचा विकास, कोकणाचा विकास, महसूल खात्याच्या स्पर्धांसाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. कर्मचाऱ्यांना सांघिक पाठबळ देणं आमचं कर्तव्य आहे, असंही उदय सामंत म्हणाले.

    विनायक राऊत – उदय सामंत कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र

    Read Latest Maharashtra Updates And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed