• Sat. Sep 21st, 2024
शरद मोहोळ हत्या प्रकरणाचं कनेक्शन कराडपर्यंत, पिस्तूल पुरवणाऱ्या धनंजय वटकरला अटक

सातारा : मागील आठवड्यात पुण्यातील कोथरूड भागातील शरद मोहोळ याचा भरदिवसा गोळ्या घालून खून झाला होता. या खून प्रकरणात कराडच्या धनंजय मारुती वटकर (रा. कराड) याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याने हल्लेखोरांना पिस्तूल पुरविल्याचा संशय असून पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.

आता पुण्यातील शरद मोहोळ याच्या खुनाच्या तपासाचे धागेदोरे कऱ्हाडपर्यंत पोहोचले आहेत. त्याचा दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केला होता. खुनाच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तपास पथके रवाना केली होती. या तपास पथकांनी पुणे ते सातारा महामार्गावर संशयित हल्लेखोरांना अटक केली होती. या गुन्ह्यात दोन वकीलांनाही अटक केली आहे. अटकेतील संशयितांकडे चौकशी केल्यावर पुणे पोलिसांना आणखी काही धागेदोरे मिळाले आहेत. या घटनेत मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यासाठी पिस्तुल पुरवणारा कऱ्हाडचा वटकर याचा सहभाग असल्याचे समोर आल्याने पुणे पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याने हल्लेखोरांना पिस्तूल पुरविल्याचा संशय आहे. त्या दृष्टीने महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
हॉटेलच्या ज्या खोलीत लेकाला मारलं, तिथे पोलिसांना चिठ्ठी सापडली, त्या रात्रीची कहाणी समोर येणार?
धनंजय वाटकरी पार्श्वभूमी गुन्हेगारी वृत्तीचे राहिली आहे. कराड पोलिसात त्याच्याविरुद्ध यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. ओगलेवाडीत मार्च २०२३ मध्ये १४ पिस्तुलांसह १० जणांना अटक केली होती. या गुन्ह्यात वटकरचा सहभाग होता. पोलिसांनी त्यालाही अटक केले होते. त्या गुन्ह्यामध्ये वटकरला जामिन मिळाला होता. जामिनावर असताना त्याने पुण्यातील शरद मोहोळ खुनातील हल्लेखोरांना पिस्तुल पुरविल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. मागील काही महिन्यांपासून वटकरचा सातत्याने पुणे परिसरात वावर वाढल्याचे बोलले जात आहे.

कराड शहर व परिसरातील आणखी काही जण पोलिसांच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. २००९ पासून कराड शहरासह तालुक्यात बेकायदा शस्त्र तस्करी वाढली असल्याचे बोलले जात आहे.

देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी पूल, ‘अटल सेतू’चे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed