• Sat. Sep 21st, 2024

लोकसभेपूर्वीच महायुतीत बेबनाव, अहिरराव यांचा भाजपात प्रवेश, अजितदादा गटाची ‘ही’ जागा धोक्यात?

लोकसभेपूर्वीच महायुतीत बेबनाव, अहिरराव यांचा भाजपात प्रवेश, अजितदादा गटाची ‘ही’ जागा धोक्यात?

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: भाजपसह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लोकसभेची तयारी सुरू असताना, विधानसभेच्या संभाव्य उमेदवाऱ्या आणि भाजपमध्ये होत असलेल्या प्रवेशांवरून महायुतीत आतापासूनच बेबनाव सुरू झाला आहे. देवळालीच्या आमदार सरोज अहिरे या अजित पवार गटात असताच, प्रशासकीय सेवेतून राजकारणात आलेल्या राजश्री अहिरराव यांनी देवळालीसाठीच भाजपमध्ये प्रवेश केल्याने महायुतीत संघर्षाला तोंड फुटले आहे. यासोबतच छत्रपती उदयनराजेंच्या नातेवाईक सोनाली राजे पवार यादेखील नाशिक पश्चिममधून इच्छुक असल्याची चर्चा असून, त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपच्या आमदार सीमा हिरेंची धाकधूक वाढली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बुधवारी अनेक महत्त्वपूर्ण प्रवेश सोहळे झाले. यात देवळाली विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांचाही समावेश आहे. राजश्री अहिरराव आणि अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांच्या विळ्या भोपळ्याचे नाते आहे. अहिरराव यांनी मतदारसंघात सामाजिक तसेच राजकीय कार्यक्रम सुरू केल्यापासून दोघींमध्ये बेबनाव आहे. त्यातच आता अजित पवार गट हा भाजप सोबत असतानाच, अहिरराव यांनी थेट बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशाने मात्र सरोज अहिरेंची डोकेदुखी वाढली आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल तोंडावर, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय

उमेदवारीसाठी प्रवेश केला नसल्याचा दावा भाजपचे नेते करत असले तरी, अहिरराव यांची निवडणूक लढविण्याची इच्छा असून, त्यासाठी त्यांनी चार-पाच वर्षांपासून मतदारसंघात मतपेरणीही केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रवेशाने या मतदारसंघात अजित पवार गट विरुद्ध भाजप असा संघर्ष उभा ठाकण्याची शक्यता अधिक आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना निवडणुकीत उमेदवारी देण्यासंदर्भात कुठलेही आश्वासन देण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. तरीही या मतदारसंघात अहिरराव विरुद्ध अहिरे असा संघर्ष दिसणार आहे.

‘पश्चिम’मध्ये अधिक इच्छुक

सोनाली राजे पवार आणि काँग्रेसच्या माजी नगरसेविका अश्विनी बोरस्तेंच्या प्रवेशाने नाशिक पश्चिममधील विद्यमान आमदार सीमा हिरेंची धाकधूक वाढली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतच सोनाली राजे पवार या पश्चिममधून इच्छुक होत्या. त्यांच्यासाठी खासदार छत्रपती उदयनराजे यांनीही फिल्डिंग लावली होती. त्यामुळे त्यांच्याकडून हिरेंसमोर आव्हान उभे केले जाण्याची शक्यता आहे. अश्विनी बोरस्ते यादेखील विधानसभेसाठी इच्छुक असल्याने या मतदारसंघात भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढणार आहे.

मलाच पुन्हा CM कर! असं पहिलं साकडं तुम्ही अयोध्येत रामाला घाला; हे ऐकून CM Eknath Shinde भारावले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed