• Mon. Nov 25th, 2024
    मराठी साहित्य संमेलनाला ‘डिजिटल टच’, पहिल्यांदाच ‘चॅट बॉट’चा वापर; प्रश्न-उत्तरे ‘व्हॉट्सॲप’वर

    प्रवीण चौधरी, जळगाव : जिल्ह्यातील सानेगुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर शहरात ७२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. साहित्य संमेलनात पारंपरिकतेला फाटा देत यंदा ‘डिजिटल टच’ देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. त्यानुसार आता साहित्य संमेलनाशी निगडीत प्रश्न व शंकांचे निरसन करण्यासाठी प्रथमच ‘चॅट बॉट’ या प्रणालीचा वापर केला जाणार आहे. या माध्यमातून व्हॉट्सॲपवर संमेलनाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

    अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे संमेलन अमळनेर येथे २, ३, ४ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान होत आहे. खान्देशात होणाऱ्या या साहित्य संमेलनात अनेक नवीन प्रयोग केले जात आहेत. अमळनेर ही सानेगुरुजी यांची कर्मभूमी असल्याने संमेलनाच्या पूर्वसंध्येला बालमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाला यंदा ‘डिजिटल टच’ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी संमेलनाशी संबंधित प्रश्न व शंकांचे निरसन करण्यासाठी प्रथमच ‘चॅट बॉट’ वापरले जात आहे. ‘संमेलनाशी निगडीत प्रश्नांची उत्तरे व्हॉट्सॲप’वर मिळणार आहेत. त्यामुळे संमेलनात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींना अडचणीविना संमेलनाला उपस्थिती लावता येणार आहे.

    अमळनेर मराठी साहित्य संमेलन

    मैदानाबाहेरही ही जोडी कमाल! बुमराहला श्रेय देऊन आधी सिराजने मन जिंकलं; मग जस्सीने जे केलं ते पाहाल तर…
    तीन माध्यमांतून माहिती

    संमेलनाशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी ‘चॅट बॉट’ला जोडून घेण्यासाठी आयोजकांकडून एक व्हॉट्सॲप क्रमांक देण्यात येईल. तसेच, जाहीर केलेल्या ‘लिंक’ किंवा व ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून देखील ‘चॅट बॉट’चा वापर करता येणार आहे.

    या प्रश्नांची उत्तरे मिळणार

    – ‘चॅट बॉट’च्या माध्यमातून संमेलन स्थळ, प्रतिनिधी व ग्रंथदालन नोंदणी, निवास व्यवस्था, भोजनाचा मेनू, तसेच चार दिवसांत होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती मिळणार

    – संमेलनस्थळी कसे पोहचावे? संपर्क कुणाशी करावा? याची माहिती व्हॉट्सअॅपवर मिळणार

    रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे टी-२० मध्ये पुनरागमन होणार, ‘रो-को’नेच BCCI ला दिले अपडेट

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *