• Sat. Sep 21st, 2024

राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिवशी राज्यात सुट्टी द्या, दारू- मांस बंदीचीही भाजप आमदारांची मागणी

राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिवशी राज्यात सुट्टी द्या, दारू- मांस बंदीचीही भाजप आमदारांची मागणी

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येमध्ये येत्या २२ जानेवारीला राममंदिरात प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार असून त्या दिवशी राज्यात सुट्टी जाहीर करावी, तसेच दारू आणि मांस बंदीही करावी, अशी मागणी राज्यातील भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

अयोध्येमध्ये नव्या राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले असून २२ जानेवारी रोजी हे मंदिर खुले होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असून संपूर्ण देशभरातच यानिमित्ताने वातावरण निर्मितीही केली जात आहे. यानिमित्ताने भाजपच्या लोकप्रतिनिधींनी मुंबईत ठिकठिकाणी अक्षता कलश यात्रांचे आयोजन केले आहे. अनेक ठिकाणी श्रीराम कथांचे प्रवचन आयोजित करण्यात येत आहे. तसेच प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी करावी, सर्व मंदिरांमध्ये भजन, कीर्तनाचे आयोजन करावे, असे आवाहनही भाजपच्या कार्यकर्त्यांकून घरोघरी जाऊन करण्यात आले आहे. त्यातच आता भाजपचे आमदार व कौशल्य, रोजगार, उद्याजकता, नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून २२ जानेवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे.

बीडमध्ये बेकायदा गर्भपात रॅकेट उघड; बडतर्फ अंगणवाडी सेविकेसह दोघे ताब्यात

२२ जानेवारी रोजी सर्वत्र दीपोत्सव साजरा करण्याच्या सूचना देऊन सार्वजनिक दीपोत्सवासाठी परवानगी द्यावी, अशीही मागणीही लोढा यांनी केली आहे. घाटकोपर येथील भाजपचे आमदार राम कदम यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. अयोध्येमध्ये पाचशे वर्षांनंतर राममूर्तीची प्रतिष्ठापना होत असून हा दिवस महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात दिवाळी साजरा करण्यासारखा आहे. संपूर्ण हिंदुस्थानात या दिवसाला एखाद्या सणाचे महत्त्व आले आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात दारू आणि मांस बंदी करावी, अशी मागणी राम कदम यांनी पत्रात केली आहे. त्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती करावी, असेही कदम यांनी पत्रात नमुद केले आहे.

राम शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता; वादग्रस्त विधानानंतर जितेंद्र आव्हाडांनी खेद व्यक्त केला

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed