• Sat. Sep 21st, 2024
नांदेडमध्ये भीषण अपघात, मंडप व्यावसायिकांचा मृत्यू, भरधाव कारच्या धडकेत नको तेच घडलं

नांदेड : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढल्याचं चित्र आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दररोज एक किंवा दोन अपघाताच्या घटना घडत आहेत. बुधवारी रात्री नांदेड जिल्ह्यात अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या कारने स्कुटीवर असलेल्या दोघांना चिरडले, त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की, धडकेनंतर स्कुटीला आग लागली, त्यानंतर कार दुभाजकावर जाऊन आदळली. नांदेड – हैदराबाद मार्गावरील अर्धापूर जवळ हा अपघात घडला. किशन प्रभाकर मोरे ( वय ३४) आणि हरीश मथुरादास गट्टाणी ( वय ३७) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही मंडप व्यावसायिक होते.

गोदापट्ट्यातील १२३ गावांवर भिस्त, मनोज जरांगेंनी ताकद लावली, गावकऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन
किशन मोरे आणि हरीश गट्टाणी दोघे नांदेड शहरातील काबरा नगर आणि नंदीग्राम सोसायटी येथील रहिवासी आहेत. दोघांचा नांदेड शहरात मंडपाचा व्यवसाय आहे. ठिक ठिकाणी जाऊन ते ऑर्डर घेत असायचे. बुधवारी सकाळी दोघेजण शाळेच्या स्नेहसंमेलनाची ऑर्डर घेण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे गेले होते. ऑर्डर घेऊन परत स्कुटीने नांदेडकडे निघाले. अर्धापूर- पार्डी रोडवरील श्री संत किशनबापू आश्रमा जवळ आले असता पाठी मागून भरधाव वेगात येत असलेल्या कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की धडके नंतर दोघांसह स्कुटी फरकटत गेली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मोठी बातमी, निमित्त लवादाचं पण पवार-मुंडे संवाद, दुवा ठरले प्रतापकाका ढाकणे, नव्या राजकारणाची नांदी?
अपघातानंतर कार देखील दुभाजकाला आदळली. घटनेनंतर कार चालक वाहन घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, त्यातच कार डिवाईडरला धडकली. त्यानंतर तो वाहन सोडून पळून गेला. या घटनेत स्कुटी आणि कारचा देखील चक्काचूर झाला होता.तर कारच्या धडकेने स्कुटी जळून खाक झाली. या प्रकरणी अर्धापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान मंडप व्यावसायिकांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मी काही लेचापेचा नाही, ८५ वर्षांच्या व्यक्तींनी आता आशीर्वाद देण्याचं काम करावं : अजित पवार
Read Latest Maharashtra News And Marathi News

अर्जुन राठोड यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed