• Mon. Nov 25th, 2024

    पुण्यात काँग्रेस पक्ष लोकसभेची उमेदवारी कोणाला देणार? ‘या’ तीन नेत्यांमध्ये चुरस

    पुण्यात काँग्रेस पक्ष लोकसभेची उमेदवारी कोणाला देणार? ‘या’ तीन नेत्यांमध्ये चुरस

    पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पुण्यात पार पडणार आहे. भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेली पुणे लोकसभेच्या जागेवर काँग्रेस पक्षातून तीन मुख्य तीन नेत्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात उमेदवारीवरून मोठी चुरस निर्माण झाली आहे. यावर आता पक्षश्रेष्ठी कसा तोडगा काढणार, हे पाहावे लागेल.

    पुणे लोकसभा भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, रवींद्र धंगेकर यांच्या कसब्यातील विजयाने काँग्रेसच्या आशा वाढल्या आहेत. त्याचबरोबर अंतर्गत उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये मोठी चुरस निर्माण झाली असल्याने स्वतः नाना पटोले आता मैदानात उतरले आहेत. ज्याप्रमाणे कसबा विधानसभेतील उमेदवारीचा तिढा नाना पटोले यांनी झटक्यात सोडवला त्याचप्रमाणे लोकसभेचा सुद्धा सोडवतील का ? हे पाहणे महत्वाचे ठरेल. या बैठकीत तिन्ही मुख्य उमेदवार आपापली भूमिका प्रदेशाध्यक्षाकडे मांडणार आहेत.

    कसबा विधासभा पोट निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेसने आता लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. आमदार रवींद्र धंगेकर यांनी कसबा विधासभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर पुन्हा रविंद्र धंगेकर यांनाच उमेवारी देतील का ? याची शक्यता सर्वधिक दिसत आहे. आमदार रवींद्र धंगेकर यांची क्रेझ अजून ही पुणे शहरात कायम आहे. सोबतच रवींद्र धंगेकर यांचे इतर पक्षीय नेत्यांसोबत देखील संबंध चांगले आहेत. त्यामुळे धंगेकर यांना उमेदवारी देणं काँग्रेससाठी सोईस्कर ठरू शकत. त्यामुळे धंगेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता सर्वधिक आहे.

    जिगरी मित्रांमध्ये चुरस, पुणे लोकसभेसाठी मनसेतून दुसरं नाव, राज ठाकरेंची पसंत ठरतील का मोरे वसंत?

    माजी आमदार मोहन जोशी यांनी खासदार गिरीश बापट विरोधात या पूर्वी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाला समोर जावं लागलं. परंतु प्रभारी म्हणून त्यांनी इतर राज्यात जाऊन काम केले, सोबतच आता पुणे शहरात सक्रिय राहून काम करत आहे. त्यासोबत जोशी यांचे संबध दिल्ली हायकमांड सोबत जवळचे असल्याने पुणे लोकसभेसाठी त्यांचा ही नावाचा विचार होऊ शकतो .

    पुणे लोकसभेच्या उमेदवारीसाठी सुनील देवधर ॲक्शन मोडवर, शक्तिप्रदर्शनासाठी कार्यक्रमांचा सपाटा

    पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे हे देखील पुणे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पुणे शहरात आक्रमक आणि दमदार चेहेरा म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. आमदार मुक्त टिळक यांच्या निधनानंतर अरविंद शिंदे हे देखील इच्छुक होते. परंतु त्यांची उमेदवारी नाकारून धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे मोठी नाराजी पक्षा अंतर्गत पाहायला मिळाली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींचा आदेश मानून अरविंद शिंदे यांनी दोन पाऊल मागे घेत रवींद्र धंगेकर यांच्यासाठी जोमात काम सुरू केलं. त्यामुळे आता अरविंद शिंदे यांचा विचार पक्ष करेल का, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

    पुणे लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीनंतर आता शिवसेना ठाकरे गट मैदानात

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed